मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्यवर केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या गंभीर आरोपानंतर, त्यांची सीबीआय आणि ईडीकडून चौकशी केली जात आहे. यातच काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने समन्स रद्द करण्याच्या देशमुखांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिल्यांनतर, आता उच्च न्यायालयानेही यावर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. तसेच, देशमुखांच्या वकिलाला सीबीआयने ताब्यात घेतले असून, त्यांना ७ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
“राजकारण आपलं पण जीव जातो जनतेचा”, मुख्यमंत्र्यांनी मनसे-भाजपला सुनावले
यातच आता अजून एक मोठी घडामोड यासंदर्भात घडून येत असून, देशमुख यांच्याभोवतीचा फास तपास यंत्रणांनी आणखीन आवळला आहे. त्यांच्या विरोधात आता ईडीने लुकआउट नोटीस जारी केली असून, यामुळे आता त्यांना देश सोडून कुठेही जाता येणार नाही. याबाबतचे वृत्त अनेक माध्यमांत प्रसिद्ध झाले आहे. तसेच, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही यासंदर्भात ट्वीट केले आहे. त्यामुळे, आता देशमुखांच्या अडचणीत फार मोठी वाढ झाली असल्याचे सांगितले जात आहे.
"Look Out"
ED issued Notice against #AnilDeshmukh intimated all Airports to see Anil Deshmukh do not runaway
"लूक आऊट"
अनिल देशमुख फरार घोषित
ED ईडीने सर्व विमानतळ प्राधिकरणांना सूचित केले आहे की अनिल देशमुख देशातून पळून जावू नये ह्याची काळजी घ्यावी. @BJP4India pic.twitter.com/ZVLA1BGFTI
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 5, 2021
“आम्ही शेतकऱ्यांवर पीक फेकून द्यायची वेळ आणली नाही”, पवारांचा घणाघात
दरम्यान, ईडीने त्यांना याआधी चौकशीसाठी पाच वेळा समन्स बजावले होते. मात्र, ते गैरहजर राहिल्यानंतर ईडीकडून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात असल्याचे दिसून येत आहे. आता त्यांना सहावे समन्सदेखील बजावण्याची तयारी ईडीने केली असून, त्याआधी त्यांनी देश सोडून जाऊ नये, म्हणून त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र, यासंदर्भात ईडी अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, त्यांनी नोटीस बजावली नसल्याचे म्हटले आहे.
पवारांनी खंजीर खुपसल्याचा एक दाखला द्या, मी राजकारण सोडतो!
दुसरीकडे, वकील डागा आणि नंतर सीबीआय अधिकारी अभिषेक तिवारीला देशमुख यांना क्लीनचिट दिल्याचा प्राथमिक चौकशी अहवाल लीक झाल्याच्या संदर्भात अटक करून ७ दिवसांची कोठडी सुनावण्यात आल्यानंतर, अभिषेक तिवारीने आयफोनसाठी 12 प्रो साठी हा चौकशी अहवाल लीक केला असल्याचे सांगण्यात आले आहे. २८ जूनला तिवारी, देशमुख प्रकरणाच्या तपासासाठी पुण्याला गेला होता. त्यावेळी, त्यांची डागा यांच्याशी भेट झाली आणि त्यांनी हा अहवाल लीक करण्यासाठी त्यांना लाच दिली होती.
Read Also :
- ग्रामीण भागातील जमिनी हडपण्यासाठी २३ गावे समावेशाचा निर्णय; चंद्रकांत पाटील यांचा घणाघात
- “निवडणुकांशिवाय महापालिका ताब्यात ठेवायचा सरकारचा कट”, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
- ‘…तसं वाटत असेल तर मला आताच अटक करावी’, संजय राऊतांचे चंद्रकांत पाटलांना आव्हान
- ‘करेक्ट कार्यक्रमा’च्या इशाऱ्यांनंतर, शेट्टींच्या आमदारकी बाबत पवारांनी केला मोठा खुलासा
- “आघाडीसोबत गेले आणि ‘काशी’ झाली, आता परत काढा आत्मक्लेश यात्रा”, खोतांचा शेट्टींना टोला