पुणे : लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही बारामती पवार कुटुंबियातच लढत होत आहे. महायुतीकडून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे युगेंद्र पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे पुतणे आहेत. त्यामुळे आता दोन्ही उमेदवारांसाठी आपापले परिवारातील सदस्य सक्रीय झाले आहेत. अलिकडेच यासाठी जाहीर सभाही झाल्या.
हेही वाचा…सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर टिका, अजित पवार संतापले, म्हणाले…
अजित पवार यांच्यासाठी खासदार सुनेत्रा पवार या प्रचारात सक्रीय झाल्या आहेत. याचसोबत पार्थ पवार, जय पवार हेही त्यात दिसत आहेत. यातच सुनेत्रा पवार म्हणाल्या की, गेल्या २० दिवसांपासून जवळपास ४५ गावांचा दौरा केला आहे. यामध्ये गावे, वाड्या, वस्त्यात जाऊन प्रचार करत आहे. गेली ३५ वर्षे मी प्रचार करत होते. तसाच प्रचार माझा चालु आहे. परंतु यंदाच्या निवडणुकीत अजितदादांच्या बाबतीत जनतेचा उत्सुर्फ प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
बारामतीत अजित पवारांच्याही सभा झाल्या. तर दुसऱ्या बाजूला युगेंद्र पवार यांच्यासाठी स्व: शरद पवार मैदानात उतरले आहेत. अलिकडेच त्यांचीही बारामतीत सभा पडली. शरद पवार यांच्यासह अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार देखील युगेंद्र पवारांसाठी प्रचार करतांना दिसत आहेत. त्यामुळे २३ नोव्हेंबरला याठिकाणी कोण बाजी मारणार ? ते पाहणंही महत्वाचे ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…बंडखोर उमेदवारांवर कॉंग्रेसकडून कारवाईचा बडगा, पुण्यातील दोन नेत्यांवर केली कारवाई
हेही वाचा…प्रशांत जगताप अन् चेतन तुपेंच्या लढाईत ‘मनसे’ कुणाला धक्का देणार ? हडपसरमध्ये तिरंगी लढत
हेही वाचा…उद्धव ठाकरेंचा जाहीरनामा प्रसिद्ध..! काय काय केल्या घोषणा ?
हेही वाचा…“बळीराजाला वाचवण्यासाठी राज्यात आघाडीचं सरकार यावं”, शरद पवारांचा विश्वास
हेही वाचा…चंद्रकांतदादांच्या पुढाकारामुळे मुस्लिमांची अतिक्रमणे हटली !