चंद्रपूर: राज्य सरकारने चंद्रपूर जिल्हातील सहा वर्षांनी पुन्हा एकदा दारु सुरु करण्याचा निर्णय घेतल्याने बार मालकाचा आनंद गगनात मावेना, दारूबंदी उठवल्याने वडेट्टीवारांची आरती करुन पूजा केल्याचा व्हिडीओ आता सोशल मिडीयावर चांगलाच व्हायर होत आहे. बार मालकांसाठी चंद्रपुरात ठाकरे सरकार बनले देव आहे असे ट्टिट करत भाजपाचे नेते भास्कर जाधव यांनी महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला आहे.
बारवाल्यांसाठी ठाकरे सरकार देव
बनले आहे. https://t.co/tjohhyzQdS— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 9, 2021
हे पण वाचा: मोठी बातमी! निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणूका पुढे ढकलल्या, ठाकरे सरकारला दिलासा!
हे पण वाचा: सहकार मंत्रालय सुरु करण्यामागचा यांचा नेमका हेतू काय? अजित पवारांनी मांडली रोखठोक भूमिका; वाचा सविस्तर
चंद्रपूर शहराच्या वेशीवर असलेल्या ग्रीन पार्क बार रेस्टॉरंटमध्ये पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा एक फोटो मालकाने लावला. बार मालकाने काउंटरच्या बाजूला दर्शनी भागात फोटो लावून पूजा आणि आरती केली. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. चंद्रपुरात दारुबंदी उठविल्यानंतर मद्यपींच्या आनंदाला उधाण आले आहे. आपला आनंद सेलिब्रेट करण्यासाठी बार मालकाने हे केलं आहे.
हे पण वाचा: सेनेनं वनमंत्रिपद सोडू नये, तर मी अध्यक्ष होण्यास तयार – भास्कर जाधव
हे पण वाचा:“डबे कितीही बदललेले तरी काही उपयोग नाही, इंजिन बदलणे गरजेच आहे”
या बार उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी केली वडेट्टीवार यांची साग्रसंगीत पूजा केली गेली. जिल्हाभरातील ७५० बार-रेस्टॉरंटच्या माध्यमातून तळीराम बंदी उठल्याचा आनंद घेत आहेत. पहिल्या ३ दिवसात सुमारे १ कोटींची दारू तळीरामानी रिचविल्याची प्राथमिक माहिती आहे. गेली ६ वर्षे अत्यंत तोट्याची गेल्याची भावना बारमालकाने व्यक्त केली. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दारुबंदी उठवून मद्य व्यावसायिक आणि बारमालक-त्यावर आधारित रोजगार यांना चालना दिल्याने हे अनंत उपकार विसरणार नसल्याची प्रतिक्रिया बार मालकांनी दिली आहे.