मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामागील संकटं काही कमी होताना दिसत नाहीय. गेल्या दोन महिन्यांपासून अटकेत असलेल्या देशमुखांना एकामागेएक झटके मिळताना दिसत आहेत. अनिल देशमुख यांच्या वकिलांकडून त्यांच्या जामीनासाठी भरपूर प्रयत्न करण्यात आले. पण देशमुखांना जामीन मिळणं कठीण होऊन बसलं आहे. विशेष म्हणजे मुंबई सत्र न्यायालयाने आज अखेर अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांचा जमीन फेटाळला
देशमुख आणि राज्य सरकारला हा सर्वात मोठा झटका आहे. अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटळण्याबाबतचा निर्णय विशेष पीएमएलए कोर्टाने आज दिला. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रानंतर अनिल देशमुख यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. सध्या देशमुख आर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत.
नाना पटोलेंची भाषा आक्षेपार्ह, त्यांना तात्काळ अटक करा; नितीन गडकरी, नारायण राणे आक्रमक
100 कोटी वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली. 12 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटकेची कारवाई केली होती. या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.
पंतप्रधान मोदींबद्दल नाही तर एका गावगुंड मोदीबाबत बोललो; नाना पटोलेंचा यु-टर्न
100 कोटी वसुलीप्रकरणी आरोप असलेले अनिल देशमुख अनेक दिवसांपासून गायब होते. अनिल देशमुख यांना 5 वेळा समन्स बजावल्यानंतरही ईडीसमोर हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांना त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तसंच देशमुख यांचा शोध घेण्यासाठी ईडीकडून सीबीआयकडे मदत मागण्यात आली होती. अखेर 1 नोव्हेबर रोजी अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले. सकाळी 11 वाजेच्या सुमारास अनिल देशमुख ईडी कार्यालयात पोहोचले होते. त्यानंतर जवळपास 12 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती.
Read also:
- सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले – अमृता फडणवीस
- भाजप आमदाराचा निष्काळजीपणा; कोरोना पॉझिटीव्ह असताना आंदोलनात सहभाग
- नाना पटोलेंना मोदींबद्दलच वादग्रस्त वक्तव्य भोवणार? भाजपची पोलिसांत तक्रार दाखल
- मनोहर पर्रिकरांनी ज्यांना मोठं केलं तेच त्यांच्या मुलाची औकात काढत आहेत – संजय राऊत
- नानाभाऊंनी, राजीनामा देवून पुण्याच्या येरवड्यात दाखल व्हावं; महापौर मुरलीधर मोहोळांचा सल्ला