कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. आता कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांची देखील कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
I have been tested positive for #Covid19 & also been admitted to the hospital on the advice of doctors as a precaution.
I request all those who had come in contact with me to check out for symptoms & to quarantine themselves.
— Siddaramaiah (@siddaramaiah) August 4, 2020
त्यांनी सांगितले की, माझी कोव्हिड-19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सावधगिरी म्हणून दाखल भरती झालो आहे. यासोबतच त्यांनी विनंती केली की, माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घ्यावे.
दरम्यान, याआधी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. याशिवाय देशातील अनेक राज्यपाल आणि नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.