दूध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. दूध संघाला २२ रुपये लाटणे दूध घालावे लागत आहे. आणि त्यात या लॉकडाउनच्या काळामध्ये दुधाचा खप देखील कमी झाला आहे. पिशवी बंद दुधाची खपत ३० टक्कायने कमी झाली आहेत त्यासाठ हॉटेल आणि चहा टपऱ्या बंद असल्याने त्याचा परिणाम देखील दूध उत्पादकांवर झाला आहे. दुधापासून बनविले जाणारे साहित्य याची देखील अवाक झाली आहे यामुळे शासनाने दूध उपदकांना मंदीचा हात देणे आवश्यक आहे अशी मागणी भाजप नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे यांनी सरकारकडे केली आहे
किमान एका लिटर ला प्रति लिटर 10 रुपये अनुदान मिल्ने आवश्यक आहे. गाईचे दूध ३० रुपये लिटरने शासनाने खखरेदी करावे तेव्हाच हा शेतकरी वाचेल आणि त्यासाठीच भारतीय जनता पक्ष, किसान संघटना, रयत क्रांती मोर्चा, रासप आणि शिवसंग्राम यांच्या सहकार्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आम्ही अभिनव आंदोलन करत आहोत. अशी माहिती अनिल बुन्दे यांनी दिली आहे.
तसेच १ ऑगस्टला हे आंदोलन सुरु होणार असून हे दूध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पर्यंत पोचवायचे असून त्यांची तब्येत चांगली राहावी यासाठी त्यांमा मोफत दूध पाठवा. असा टोला देखील बंडे यांनी राज्यसरकारला लगावला आहे.
मुख्यमंत्री दूध प्या आणि दुधाला भाव द्या…
१ ऑगस्ट ला दुधाला प्रति लिटर 10 रुपये अनुदान मिळण्यासाठी भाजपा किसान अभिनव आंदोलन@BJP4Maharashtra शेतकऱ्यांच्या पाठीशी…. pic.twitter.com/5bKILnVIa3
— Dr. Anil Bonde (@DoctorAnilBonde) July 17, 2020