नवी मुंबई : कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि माजी आमदार विवेक पाटील यांना अटक केली आहे. ईडीने विवेक पाटील यांना त्यांच्या पनवेल येथील घरातून ताब्यात घेतले. कर्नाळा बँकेच्या ५२९ कोटींच्या घोटाळ्यातील विवेक पाटील हे प्रमुख आरोपी आहेत.
पनवेलमध्ये या गैरव्यवहाराविरोधात काही महिन्यांपूर्वी मोर्चे देखील काढण्यात आले होते. विवेक पाटील यांच्या धोरणामुळे ठेवीदार संकटात सापडले होते. त्यांना अटक करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक मोर्चे, आंदोलने करण्यात आली होती.
कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी रायगड जिल्हा विशेष लेखापरीक्षकांनी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह संचालक, अधिकारी अशा 76 जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्याआधारे याआधीच सर्वांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
50 हजार 689 ठेवीदारांच्या 529 कोटीच्या ठेवी बँकेत होत्या. बँकेच्या सुरुवातीपासून तत्कालीन शेकाप नेत्यांनी स्वतःच्या उद्योग व्यवसायासाठी बँकेतून गैरमार्गाने कोट्यवधी रूपयांच्या ठेवी उचलून बॅकेत गैरव्यवहार केला होता मात्र, ऑडिट रिपोर्टमध्ये सर्व गैरव्यवहार दडपण्यात आले होते.
Read Also :
- आषाढी वारीसाठी प्रशासनाकडून नियमावली जाहीर, पाहा काय आहेत नियम
- ‘नाना, काँग्रेसला हे दोन्ही पक्ष भीक तरी घालतात का?’
- ‘राम मंदिराच्या नावाने चंदा, हाच भाजप आणि आरएसएसचा धंदा’
- ‘दोन्ही राजे एकत्र आल्याचे स्वागत, पण त्यांचं बोलणं भाजपच्या मिठाला जागल्यासारखं’
- ‘मराठा समाजासोबतच दोन्ही राजेंनी ओबीसींच्या हक्कासाठी सुद्धा पाठिंबा द्यावा’
- केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलांच्या चर्चा, प्रीतम मुंडेंची मंत्रीपदी वर्णी लागणार ?