हॅंडसम तर माजी पंतप्रधान राजीव गांधीही होते… आणि ते चांगले इंग्रजीही बोलायचे असा पलटवार सचिन पायलट यांचे कट्टर समर्थक आमदार विश्वेंद्रसिंह यांनी करतानाच खरे बोलण्याची आणि ऐकण्याची ताकद दोघांनी ठेवली पाहिजे, स्वाभिमान जीवंत आहे असा हल्लाबोलही त्यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर केला आहे.
गेहलोत यांनी पायलट यांच्यावर टीका करताना हॅडसम दिसणे आणि इंग्लीश बोलणे म्हणजे सर्व काही असते असे कोणी समजू नये असे म्हटले होते. आज विश्वेंद्रसिंह यांनी गेहलोताना जशास तसे उत्तर दिले आहे. ते म्हणाले, की राजीव गांधींही हॅंडसम होते आणि त्यांनाही चांगले इंग्रजी येत होते. वास्तविक खरे बोलणे आणि ऐकण्याची तयारी दोघांनीही ठेवायला हवी.”
तसेच आमदार रामनिवास गवारिया यांनी म्हटले आहे, की हक्काचा आणि अपमानाचा बदला घेतल्याशिवाय आता आम्ही गप्प बसणार नाही. सचिन पायलट यांच्या नेतृत्वाखाली युवा पिढी जादूगारांच्या टोळ्यांच्या अंत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. प्रत्येकवेळी दडपशाही करणे हा आपला व्यवसाय बनला आहे पण, तुमची दडपशाही कदापी सहन केली जाणार नाही हे ही लक्षात घ्यावे असा इशाराही मुख्यमंत्री गेहलोत यांना त्यांनी दिला आहे.