IMPIMP

नाना पटोले यांचे खंदे समर्थक भंडारा नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष यांचा भाजपात प्रवेश    

भंडारा : काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे खंदे समर्थक, तसेच निकटवर्तीय मानले जाणारे भंडारा नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष  सुर्यकांत इलमे यांनी नाना पटोले यांना जय महाराष्ट्र करत अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, डॉ परिणय फुके, खासदार सुनील मेंढे आदी उपस्थित होते.

चर्चा फक्त फडणवीस-पवारांच्या भेटीगाठींची, राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याच्या तर्कवितर्कांना उधाण 

भंडारा नगरपरिषदेचे माजी उपाध्यूक्ष सर्यकांत इलमे हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले खंदे समर्थक म्हणून ओळखले जायचे. सूर्यकांत इलमे पहिल्यांदा भंडारा नगरपरिषदवर निवडून आले होते. राष्ट्रवादीमधून निवडून आल्यानंतर त्यांना शेवटचे एक वर्ष भंडारा नगर परिषदेचे उपाध्यक्षपद सुद्धा मिळाले.  नाना पटोले यांचे जवळचे व्यक्ती म्हणून सूर्यकांत इलमे यांना लोक ओळखू लागले. २००९ मध्ये निवडणूक हारले तेव्हा नाना पटोले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यापाठोपाठ सूर्यकांत इलमे  यांनी भाजपात प्रवेश केला २०१४ च्या निवडणुकीमध्ये नाना पटोले पुन्हा भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडून आले. त्यावेळी सुद्धा सूर्यकांत ईलमे यांनी नाना पटोले यांच्यासाठी निवडणुकीत काम केले.   नाना पटोले यांनी सुद्धा लोकसभेचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला पण इलमे हे काँग्रेस मध्ये गेले नाही नाना समर्थक म्हणून काम करत राहिले.

शिरुरचे आजी-माजी खासदार आमने-सामने; रस्ता उद्घाटनाचे श्रेय लाटण्यासाठी आक्रमक!

मात्र कालांतराने नाना पटोले यांचे व्यक्तिमत्व मोठं होत गेलं. त्यामुळे त्यांचे समर्थक समजले जाणारे लोक त्यांच्यापासून दुरावत चालले. त्यामध्ये इलमे हे सुद्धा आहेत.  नाना पटोले आपले काम करत नाही आणि आपल्याला मोठं होऊ देत नाही. या मानसिकतेमुळे अखेर नाना पटोले यांना सोडत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Read Also :

Total
0
Shares
Previous Article

एक दूसरे की ताक़त बनकर खड़े रहेंगे- नहीं डरे हैं, नहीं डरेंगे! - राहुल गांधी

Next Article

मुसळधार पावसात मुंबईत 22 मृत्यू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली नुकसान भरपाईची घोषणा

Related Posts
Total
0
Share