काही दिवसांपुर्वीच सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. ही मुलाखत बरीच गाजली होती. आता संजय राऊत यांनी सामनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली असून, येत्या 25,26 जुलै रोजी ही मुलाखत पाहता येणार आहे. संजय राऊत यांनी ट्विटवरून याबाबत माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे @uddhavthackeray
यांची घणाघाती मुलाखत सामना साठी घेतली.
सर्वच प्रश्नांना दिलखुलास ऊत्तरे मिळाली..ऊध्दव ठाकरे यांची दिलकी बात राजकारण ढवळून काढेल. करोना पासून राम मंदिरा पर्यंत मुख्यमंत्री ठाकरे दणक्यात बोलले..
मुलाखत 25 26 जुलै रोजी वाचता पहाता येईल. pic.twitter.com/y8SSoAFlhV— Sanjay Raut (@rautsanjay61) July 20, 2020
संजय राऊत यांनी ट्विट करत माहिती दिली की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घणाघाती मुलाखत सामनासाठी घेतली. सर्वच प्रश्नांना दिलखुलास ऊत्तरे मिळाली. उद्धव ठाकरे यांची दिल की बात राजकारण ढवळून काढेल. कोरोना पासून राम मंदिरापर्यंत मुख्यमंत्री ठाकरे दणक्यात बोलले. मुलाखत 25,26 जुलै रोजी वाचता पहाता येईल.
कोरोनापासून ते राममंदिरापर्यंत अशा विविध मुद्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. दोन भागामध्ये ही मुलाखत पाहता येईल.