मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी सकाळी ट्विट करून ही लोकशाहीची हत्या असून आपण आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं ट्विट केलं. यावरून मनसेनेते गजानन काळे यांनी जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावला आहे.
स्वत:च्या मतदारसंघात आणि ठाणे शहरात कधीही शिवजी महाराजांची जयंती त्यांनी साजरी केली नाही, विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा न देता, ट्विटरवर आपल्या आमदारकीचा राजीनामा देणाऱ्या लहान मुलांना बालदिनाच्या मोक्कार शुभेच्छा …,असा टोला मनसेनेते गजानन काळे यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावला आहे.
विधानसभा अध्यक्षांकडे नाही तर ट्विटरवर आपल्या आमदारकीचा राजीनामा देणाऱ्या लहान मुलांना बालदिनाच्या मोक्कार शुभेच्छा …#ChildrensDay2022 #HappyChildrensDay
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) November 14, 2022
आव्हाड यांचा राजीनामा देण्याचा निर्णय, त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची रास्तारोको, जाळपोळ यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाष्य केलं आहे. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये आली आहे. या यात्रेचे लक्ष आपल्याकडे वेधवून घेण्यासाठी आव्हाडांनी नाटक केलं आहे. या कलाकाराला राज्याने ओळखावे, असं गजानन काळे म्हणाले. मनसेनते गजानन काळे यांनी आव्हाडांचा एक जुना व्हिडीओ ट्विट करत खिल्ली उडवली आहे.
एक जण आत्ताच म्हणाला …
मुंब्राचा ” नटसम्राट ” pic.twitter.com/5S5TbkOpLQ— Gajanan Kale (@GajananKaleMNS) November 14, 2022
सिनेमा आठवतोय का ?
नौटंकी साला …#अराजकीय— Gajanan Kale (@GajananKaleMNS) November 14, 2022
सोबतच, सरकारचं आता अती होतंय! एकदा प्रयत्न करून बघितला पण सत्याचा आवाज दाबता येत नाही म्हणून दुसऱ्या गुन्ह्यात गोवणं हा रडीचा डाव आहे! तक्रारदाराची राजकीय पार्श्वभूमी आणि तो व्हिडीओ बघितला तर कोणतीही महिला भगिनी सांगेन की, सत्य काय आहे? असं ट्विट आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.
सरकारचं आता अति होतंय!
एकदा प्रयत्न करून बघितला पण सत्याचा आवाज दाबता येत नाही म्हणून दुसऱ्या गुन्ह्यात गोवणं हा रडीचा डाव आहे!
तक्रारदाराची राजकिय पार्श्वभूमी आणि तो व्हिडिओ बघितला तर कोणतीही महिला भगिनी सांगेन की, सत्य काय आहे? https://t.co/nDvaJEGzav— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 14, 2022