मुंबई : उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी खासदार गजानन किर्तीकर, दिवाकर रावते आणि अन्य आमदार, खासदार वर्षा बंगल्यावर तासन् तास वाट पाहत असायचे. परंतु उद्धव ठाकरे त्यांना भेट देत नसत. भाजपकडून शिवसेनेच्या आमदारांवर कायम अन्याय झाला असं उद्धव ठाकरे सांगत आहेत. मग मुख्यमंत्री पदाचं चॉकलेट देऊन त्या अडीच वर्षात अजित पवारांनी अर्थमंत्री असतांना शिवसेनेच्या आमदारांना किती पैसे दिलेत. ? असा सवालही नितेश राणे यांनी केला आहे.
हेही वाचा…“शिंदेंच्या सभेसाठी अधिकाऱ्यांना ५० हजार, १२ हजार, ६ हजार देण्याचे आदेश”, ठाकरे गटाच्या नेत्यांचा गंभीर आरोप
नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊतांवरही निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीची गौतमी पाटील आहे. तिला बघायला लोकांना जस आवडतं. तसं आपल्यालाही बघायला लोक चॅनल सुरू करतात. असं राऊत यांना वाटतं. पण त्यांचा हा गैरसमज दुर केला पाहिजे. गौतमी पाटीलल विनंती करेन तुझं मेकअपच सामान राऊतांना पाठवून दे. असं सांगतानाच आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचे पहायचे वाकून हे महाविकास आघाडीच्या गौतमी पाटीलने करू नये. अशी टिकाही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…पुणे जिल्हा विभाजनाच्या मागणीला भाजपाचे संघटनात्मक ‘बळ’, संघटनात्मक बदलांमध्ये दोन विभाग : जिल्ह्याला दोन अध्यक्षपदाची निर्मिती?
दरम्यान, मागील काही महिन्यापासून राज्यात गौतमी पाटील वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आली आहे. यातच नितेश राणे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर सातत्याने टिका करीत आहेत. यातच आता नितेश राणे यांनी संजय राऊतांची तुलना गौतमी पाटलाशी केल्याने एकच चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…आपची ‘महाराष्ट्रात’ जोरदार धडक..! राज्यात ‘स्वराज्य यात्रेचं आयोजन, सहभागी होण्याचं मुयर दौंडकरांचं आवाहन
हेही वाचा…“कुणी कितीही दावा केला तरी आम्ही जागा लढविणार,” बच्चू कडूंनी नवनीत राणांच्याविरोधात शड्डू ठोकला,
हेही वाचा…शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र होणार ? अपात्रतेच्या कारवाईला वेगाने हालचाली
हेही वाचा…काॅंग्रेसमधून निलंबित, फडणवीसांच्या भेटीनंतर भाजपात येण्याच्या बातम्या, आशिष देशमुख म्हणाले, “माझी राजकीय आता वाटचाल…”
हेही वाचा…“संजय राऊत हा राजकारणातला प्रेम चोपडा, त्याला नसबंदी…” सजंय शिरसाठ यांचा राऊतांना टोला