औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील तर ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनासाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरले आहेत. अशातच आता येत्या २५ जुलैपासून संपुर्ण राज्यात वंचित आरक्षण बचाव यात्रा सुरू करणार आहे. आज वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे मोठी घोषणा केली आहे. यातच काही महिन्यांवर राज्यात विधानसभेची निवडणुक होऊ घातली आहे. त्याआधी महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा आता दिवसेंदिवस तापत चालला आहे.
यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सर्व ओबीसी घटकांची मागणी होती की वंचित बहुजन आघाडी भूमिका मांडत आहे ती गावोगावी गेली पाहिजे. सामाजिक संघटनांना सोबत घेऊन आम्ही २५ तारखेला दादर चैत्यभूमी येथून आरक्षण बचाव यात्रेला सुरूवात करायची आहे. त्याच दिवशी फुलेवाडा येथे जायचे. २६ तारखेला शाहू महाराजांनी आरक्षणाची घोषणा केली होती. तेव्हा राजर्षी शाहू महाराजांना नतमस्तक होऊन आरक्षण बचाव जनयात्रा काढण्याचे आम्ही ठरवले आहे.
हेही वाचा..राजकारणात मोठी उलथापालथ होणार का ? प्रकाश आंबेडकर आज मोठी घोषणा करणार
जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन सुरू केले आहे. दुसऱ्या बाजूस सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. त्या सर्वपक्षीय बैठकीला सर्व मराठा नेते राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेनेचे कोणीच उपस्थित नव्हते. त्यामुळे त्या बैठकीत नेमकी राजकीय पक्षाची भूमिका काय ? हा प्रश्न वंचित बहुजन आघाडीकडून विचारण्यात आला. असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवार यांनी अजित पवारांना महायुतीतून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीपक्षासोबत मैत्री करण्याची ऑफर दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही नेहमीचा मार्ग अवलंबला आहे. आम्ही स्वबळावर लढणार आहोत. असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय. तसेच अजित पवारांचा गट ते आम्हाला वापरत आहेत. असे म्हणत आहे. वंचितकडे जाता असे सांगत आहेत. आम्हाला थांबवायचे असेल तर सीट वाढवा असे सांगत आहे. अजित पवार यांनी बाहेर पडावे. त्यांचे राजकारण आम्ही रिईस्टॅब्लिश करतो असे विधान देखील प्रकाश आंबेडकर यांनी केलंय.
READ ALSO :
हेही वाचा..“दोष एकनाथ शिंदेंना कशाला द्यायचा ? दोष स्वतःच्या स्वभावाला द्या”