पुणे : आगामी जिल्हा परिषद, महापालिकांच्या निवडणूका होणार आहेत, अशी घोषणा करताना पुणे जिल्ह्यांत वातावरण राष्ट्रवादीयम झालं आहे. आता कार्यकर्त्यांनो कामाला लागा. जिल्हा परिषद, महापालिकांच्या निवडणुकीमध्ये चांगली ताकद लावून आपल्या उमेदवारांना विजयी करा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.
‘बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढला, तर शिवसेनेची किंमत शून्यापेक्षाही कमी’
आज (मंगळवार) अजित पवार यांच्या हस्ते पुण्याच्या मांजरीमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित घुले यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पार पडलं. या उद्घाटन सोहळ्याला अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हजेरी लावली. जयंत पाटलांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन पार पडल्यावर अजित पवार यांनी छोटेखानी भाषण केलं. या भाषणात त्यांनी जिल्हा परिषद, महापालिकांच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकलं तसंच कार्यकर्त्यांना कानमंत्रही दिला.
उद्धव ठाकरे अन् रश्मी ठाकरेंच्या बेनामी मालमत्तेच्या चौकशीसाठी अलिबागला जाणार – किरीट सोमय्या
अजित पवार म्हणाले, लवकरच जिल्हा परिषद, महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. कार्यकर्त्यांनी झटकून कामाला लागण्याची गरज आहे. जनतेचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत आघाडीला चांगली मदत दिलं, बळ दिलं. पुणे जिल्ह्यांत राष्ट्रवादीचे 10 आमदार आणि काँग्रेसचे 2 आमदार निवडून दिले. आता पुण्यात वातावरण राष्ट्रवादीयम झालंय. इथून पुढेही असंच काम करा, असा कानमंत्र अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.
‘पुढच्या आठवड्यात मुश्रीफांचा तिसराही घोटाळा बाहेर आणणार!’
“जनतेमुळे, कार्यकर्त्यांमुळे आम्ही विविध पदं भूषवत असतो. कुणी आमदार, कुणी खासदार, मी उपमुख्यमंत्री जनतेमुळे आहे. सगळ्यांनाच पदाची अपेक्षा असते. दरम्यान , कार्यकर्ता केवळ काम करत असतो. आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये सगळ्यांना पदं कशी मिळतील, हे पाहिलं जाईल, अशा शब्द अजित पवार यांनी दिला. तसंच जुन्या आणि नव्या चेहऱ्यांना एकत्र करुन समतोल साधण्याचं कामंही केलं जाईल. शेवटी पक्षात आलेल्यांना समाधानी करणं देखील महत्वाचं असतं”, असंही अजित पवार म्हणाले.
Read Also :
- शिवसैनिकांची नार्को टेस्ट करा, त्यातुन राष्ट्रवादीसोबत युती नको हाच आवाज येईल – सुधीर मुनगंटीवार
- काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीचा जन्म, शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत – शिवसेना
- काँग्रेसच्या २ नेत्याचे घोटाळे काढल्यास फडणवीसांच्या काळातील फाईल बाहेर काढणार – नाना पटोले
- चंद्रकांत पाटलांवर करमणूक कर लावा! चाकणकरांची उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी
- सोमय्यांवरील कारवाईत पवारांचा हस्तक्षेप? वळसे पाटलांचे स्पष्टीकरण