पुणे शहरात लाॅकडाऊन असूनही कोरोना का वाढतोय, या प्रश्नाला पुण्याच्या खासदारांनी उत्तर दिले ”ते लाॅकडाऊन’ लावणाऱ्याला विचारा,”. शहरात पुन्हा लाॅकडाऊव लावला तर आम्ही काय करायचे ते पाहू असेही सांगत खासदार गिरीश बापट यांनी पालकमंत्री अजित पवार यांना इशारा दिला.
‘जेव्हा पहिला लाँकडाऊन झाला तेव्हा राज्य सरकारला आम्ही मदत केली .पण दुस-यादां लाॅकडाऊन करुन काही साध्य होताना दिसत नाही. यापेक्षा टेस्टिंग वाढविणे गरजेचे असुन ज्या हाँस्पिटल महत्वाच्या गोष्टी कमी पडतील तर त्या तातडीने पुरविणे गरजेचे आहे. जर यापुढे लाॅकडाऊन जर वाढविला तर भाजप आपली भुमिका योग्य वेळी मांडेल,” असे बापट यांनी यावेळी सांगितले.
सरकारने कोणाला विचारात घेऊन कुठलाही निर्णय घेतलेला नाही. लॉकडाऊनच्या काळात आम्ही सरकारला सहकार्य केले. आता पुन्हा लॉक डाऊन केलं तर बघू, असे म्हणत बापट यांनी सरकारला इशारा दिला.