जळगाव: काही महिन्यांपूर्वी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला . राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे माजी जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांचे भारतीय जनता पक्षात वजन वाढल्यामुळे आणि त्यांची एकाधिकारशाही वाढल्यामुळे खडसेंनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडली होती. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या वादात ठिणगी पाडणारी एक ऑडिओ क्लिप सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यासंदर्भातील क्लिप ही जळगाव लाईव्हने सोशल मीडियावर व्हायरल केली आहे .
या ऑडिओ क्लिपमध्ये जामनेर तालुक्यातील वडगाव बुद्रुकचा एक तरुण पाणी नसल्याने एकनाथ खडसे यांना फोन करून तक्रार करत असतो. त्यावर एकनाथ खडसे उत्तर देतात की, ‘जामनेरचा आमदार कुठे मेला?’ वडगाव बुद्रुकच्या त्या तरुणाच्या अडचणीला उत्तर देताना एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांबद्दल बोलताना म्हटलं आहे की, “जामनेरचा आमदार गिरीश काय करतोय तिकडे बायका मागे फिरतोय का नुसता!” त्यावर आमदार साहेब फोन उचलत नसल्याचं तो मुलगा सांगतो .
त्या मुलाने आमदार साहेब फोन उचलत नसल्याचे सांगितल्यानंतर एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन फक्त पोरींचे फोन उचलतात, अशा प्रकारचा टोला लगावला आहे. एकनाथ खडसे यांची ही क्लिप जळगाव लाईव्हने वायरल केल्यानंतर सोशल मीडियावर या क्लिप मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. मात्र यानंतर गिरीश महाजन विरुद्ध एकनाथ खडसे असा वाद पुन्हा एकदा पेटणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत .भारतीय जनता पक्षाचे आमदार गिरीश महाजन आता या प्रकारावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. Girish Mahajan just picks up girl’s phone; Eknath Khadse’s audio clip goes viral