म्हापसा : जेष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांची निधनामुळे भाजपने काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हर्च्युअल सभा रद्द केल्या होत्या. काल होणारा जाहीरनामा प्रकाशनाचा कार्यक्रम देखील यामुळेच पुढे ढकलण्यात आला होता. दरम्यान, आता येत्या ११ फेब्रुवारी रोजी म्हापसा मतदारसंघात मोदींची प्रत्यक्ष सभा होणार आहे. दुसरीकडे जाहीरनामा प्रकाशन कधी होणार याबाबत लवकरच कळवले जाईल असे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी सांगितले आहे.
म्हापश्याच्या सर्वांगीण विकासासाठी जनताच आता जोशुआ डिसुझा यांना निवडून देईल – खेडेकर
गोवा विधानसभेच्या निवडणुकांसाठी प्रचाराला वेग आला आहे. भाजपा, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षांचे धुरंधर नेते ठिकठिकाणी प्रचार बैठकांमधून मतदारांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. येत्या 14 तारखेला गोव्यामध्ये निवडणुका होणार आहेत. सत्तारुढ भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष काँग्रेस यांनी या निवडणुकीत संपूर्ण बहुमत मिळण्याचा दावा केला आहे.
उदयनराजेंच्या दहशतीच्या पार्श्वभूमीमुळे सातारा एमआयडीसीची वाढ होईना; शिवेंद्रराजेंचा गंभीर आरोप
दरम्यान, सध्या बार्देशमधील म्हापसा मतदारसंघ हा सध्या बऱ्याच चर्चेत आहे. २०१९ साली फ्रान्सिस डिसुझा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र जोशुआ हे काँग्रेसच्या सुधीर कांदोळकरांचा पराभव करून विजयी झाले. यंदा बहुरंगी लढत होत असली तरीही यावेळी सुद्धा कांदोळकर व जोशुआ मध्येच मुख्य लढत होणार आहे.
Read also:
- प्रचारादरम्यान मतदारांनी फ्रान्सिस डिसोझा यांच्या आठवणींना दिला उजाळा; जोशुआ झाले भावूक
- उद्धव ठाकरे यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करणार; किरीट सोमय्यांचा गंभीर इशारा
- लतादीदींच्या स्मारकावरून राजकारण नको; राम कदमांच्या स्मारकाच्या मागणीवरून संजय राऊतांनी फटकारले.
- नितेश राणेंचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला; जामीन अर्जावर आता उद्या सुनावणी
- स्वर्गीय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हेच गोव्याच्या विकासाचे शिल्पकार – देवेंद्र फडणवीस