जळगाव : मराठी बिग बाॅस मध्ये संधी मिळाली तर अवश्य जाऊ असं वक्तव्य राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. आगामी काही दिवसात बिग बाॅसचा नवा सिजन सुरू होत आहेत. त्यामध्ये राजकारणी नेते कोणकोण जाणार असं नाव घेतल्यानंतर गुलाबराव पाटलांना प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्यांनी हे उत्तर दिलं आहे.
“निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार..;” दसरा मेळाव्याचा शिवसेनेचा टीझर रिलीज
मराठी बिग बाॅग मध्ये प्रसिद्धी दिग्ददर्शक, अभिनेता, महेश मांजरेकर यांनी अलिकडेच यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. जर बिग बाॅसमध्ये राज्यातील राजकारण्यांपैकी कुणाला बोलावल तर त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, गुलाबराव पाटील यांची नावं घेतली होती. त्यानंतर राज्यात एकच चर्चा रंगली होती. त्यावर पाटलांंनी उत्तर दिलं आहे.
सरनाईकांचा मतदार संघ भाजपला हवा..! शिंदे प्रताप सरनाईक यांच्यात कडाक्याचे भांडण
आम्हाला बोलावलं तर निश्चितपणे जाऊ, मला असं वाटतं की गुलाबराव पाटलाला बिग बाॅसमध्ये कोणी बोलवत असेल आणि अशी संधी जर मिळत असेल तर मला माझ्या मागच्या जीवनाची आठवण होतेय. शालेय तसेच महाविद्यालयीन जीवनात नाटकामध्ये म्हणा, गाण्यांमध्ये म्हणा ही भाग घेत होतो. जर आता बिग बाॅसमध्ये बोलावले तर ही सोन्यासारखी संधी आहे. मिळाली तर निश्चितपणे जाऊ असं त्यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचा बारामतीतील ओबीसींचा “हा” आक्रमक चेहरा भाजपने फोडला
दरम्यान, हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेत असणारा बिग बाॅस हा शो नेहमी वेगवेगळ्या कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. विश्वातील सर्वात लोकप्रिय वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून देखील हा ओळखला जातो. यामध्ये विविध क्षेत्रातील कलाकार, प्रसिद्ध व्यक्ती, वादग्रस्त व्यक्तिमत्व हे बिग बाॅस या शोमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतात. उद्यापासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून हिंदी बिग बाॅसला सुरूवात होत आहे. तर मराठी बिग बाॅस 2 ऑक्टोबर पासून सुरूवात होणार आहे.
Read also
- “मिंधे गटाची पहिली विकेट गेली, अशा 40 पैकी 39 विकेट जाणार”; रूपाली पाटील
- “ED पासून सुटका व्हावी म्हणून BJP मध्ये गेले, पण शेवटी भाजपने इडी भीती घातलीच”
- “शिंदेंचा दसरा मेळाव्याचा टीझर पाहिला, पण त्यात ‘एक निष्ठ’ शब्द राहून गेला”; सुषमा अंधारे
- वाजत गाजत , गुलाल उधळत या.. पण शिस्तीत..! मेळाव्यासाठी शिवसैनिकांना ठाकरेंचं आवाहन
- ममता बॅनर्जी, मायावती, केजरीवाल यांचा दाखला देत फडळकरांचा सुळेंना टोला; म्हणाले..