कोल्हापूर: मागच्याच महिन्यात कोल्हापूर जिल्हा दूध उतपदक संघ(गोकुळ) चे प्रमुख कर्मचारी, खातेप्रमुख, संचालकांची तब्ब्ल ५ तास बैठक घेऊन पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अक्षरशः झडती घेतली होती . आता लवकरच निवडणुकीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण होणार आहे. गोकुळच्या दूध उत्पादकांना गोकुळ दूध उत्पादक संघाकडून दोन रुपये दरवाढीची भेट मिळण्याची शक्यता होती. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील हे गोकुळच्या दूध उत्पादकांना दर वाढीची घोषणा आज केलेली आहे.
हे पण वाचा, संभाजीराजे यांच्या मागण्याबद्दल सरकार 100 टक्के सकारात्मक -सतेज पाटील
हे पण वाचा, सतेज पाटील आणि हसन मुश्रिफांकडून गोकुळची झाडाझडती; अधिकाऱ्यांना धरले धारेवर
गोकुळच्या दूध उत्पादकांना दरवाढ देण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. म्हशीच्या दुधाला २ रुपये दरवाढ तर गायीच्या दुधाला १ रुपयाची दरवाढ देण्यात आली आहे. ही दरवाढ ११ जुलै २०२१ पासून लागू करण्यात येणार आहे अशी माहिती पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या दरवाढीचा फरक २१, २२ तारखेला बिलामध्ये देण्यात येणार आहे. अमूलने मागच्याच आठवड्यांमध्ये दुधाच्या दरांमध्ये वाढ केली होती आणि आता गोकुळनेही विक्रीच्या दुधाचा दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गोकुळच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कसा फायदा होईल याकडे सर्वस्वी लक्ष देण्यात येणार असल्याचे बंटी पाटलांनी स्पष्ट केले आहे.
हे पण वाचा, कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या मनावर राज्य करणारे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पा..
हे पण वाचा, न्यायालयाची शेतकरी कायद्यांना स्थगिती, मात्र लढाई अजून संपलेली नाही – सतेज पाटील
एकीकडे दूध उत्पादकांना जरी दरवाढ देण्यात आली असली तरीदेखील कोल्हापूर जिल्हा वगळला तर अन्य जिल्ह्यांमध्ये गोकुळच्या विक्री दरामध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे. विक्री दरामध्ये दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दूध विक्रीबाबतची दरवाढीची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. भूमिहीन शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून २ म्हशी घेण्यापर्यंत विनातारण कर्ज देणार असल्याची घोषणा देखील करण्यात आली आहे, आगामी काळात २० लाख लिटर दूध संकलनाचा संकल्प देखील करण्यात आलेला असल्याचे सांगितले आहे.
- पक्षात मी-मी चालत नाही, आधी राष्ट्र, पक्ष आणि शेवटी मी; ही भाजपची संस्कृती, पंकजाताईंचा रोख कुणाकडे?
- पुण्यात एकाच तिकिटावर मेट्रो आणि बसने प्रवास करता येणार – देवेंद्र फडणवीस
- प्रकाश आंबेडकर ICU मध्ये, मात्र बायपास सर्जरी यशस्वी, रेखा ठाकूर यांची माहिती
- “मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील सर्वांना फडणवीसांनी संपवलं”, शिवसेनेची टीका
- अँटिलिया स्फोटकं-मनसुख हिरेन हत्या प्रकरण : घडामोडींना वेग, तळोजा जेलमध्ये होणार वाझेची चौकशी