कोल्हापूर: गोकुळ दूध संघात तब्ब्ल २५ वर्षांनंतर सत्तांतर झाले आणि सतेज पाटील गट व मुश्रीफ गटाला सत्ता मिळाली.गोकुलमध्ये सत्ता आल्यानंतर मुंबईतील टँकर भाड्यांमध्ये १७ पैशांची कपात करून गोकुळ दूध संघाची वार्षिक ५.५० कोटींची बचत करण्याचा निर्णय नवीन संचालक मंडळाने घेतला होता. २८/६/२०२१ रोजी झालेल्या गोकुळच्या बैठकीत पुण्यातील दूध विक्रीच्या ठेकेदाराला बदलण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला होता आणि पुण्यातील दूध विक्रीच्या ठेकेदाराला नोटीस देखील पाठवण्यात आली होती.
हे पण वाचा, हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरकरांची जाहीर माफी मागितली.
पुण्यातील दूध वितरण व पॅकेजचा गायत्री कोल्ड स्टोरेजचा ठेका माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे जावई विजय डेरे यांच्याकडे आहे. गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर हा ठेका सध्याच्या संचालक मंडळातील कार्यकर्त्याला देण्यात यावा यासाठी धडपड चालू होती. मात्र याबाबत पुण्यातील राजकारण मध्ये आल्याने सध्याच्या संचालकांची कोंडी झाली आहे. राष्ट्रवादीच्या पुण्यातील बड्या नेत्याने याबाबत थेट नाराजी व्यक्त करत ठेका पूर्वरत करण्याचे आदेशच दिले आहे.
हे पण वाचा, कोल्हापुरात गोकूळनंतर आता कोरोनाच्या मुद्द्यावरून महाडिक – पाटील गट आमने सामने
हे पण वाचा, कृष्णा साखर कारखाना: एक कटाक्ष डॉ. सुरेश भोसलेंच्या विजयावर अन् दोन्ही मोहितेंच्या पराभवावर
राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने ठेका रद्द करू नये यासाठी गोकुळच्या नेत्यांशी देखील चर्चा केल्याचे समजत आहे. गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयासमोर व ताराबाई पार्क येथील ठेके बदलण्यात आले होते. त्यातील एक ठेका विद्यमान संचालकांच्या जवळच्या कार्यकर्त्यांकडे देण्यात आला होता. मात्र आता तो बंद करून दुसऱ्याच व्यक्तीला देण्याचा निर्णय झाल्याने हाती आले धुपाटणे अशी चर्चा सध्या रंगत आहे. त्याचप्रमाणे पशुखाद्य वाहतुकीचे ठेके देखील माजी संचालकांच्या निकटवर्तीयांनी कमी रक्कमेत टेंडर भरल्याने त्यांनाच द्यावे लागणार आहेत.
हे पण वाचा,
सतेज पाटील आणि हसन मुश्रिफांकडून गोकुळची झाडाझडती; अधिकाऱ्यांना धरले धारेवर
गोकुळने शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचे काम केले आहे; शरद पवार यांनी केली गोकुळची मनभरून प्रशंसा