कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील तीन मंत्री , दोन खासदार आणि डझनभर आजी – माजी खासदार आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघात ( गोकुळ ) पुन्हा सत्तारुढच बाजी मारणार की संघात सत्तांतर होणार याचा फैसला आता शेवटी होणाऱ्या मतमोजणीत होणार आहे खुल्या गटातील उमेदवारांची मतमोजणी करण्यास सुरुवात झालेली आहे.राखीव गटातील १६ पैकी १३ जागांवर आता विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडी आता संपूर्ण आघाडीवर आहे.
गोकुळच्या सहाव्या फेरीअखेर सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ गटाचे १४ उमेदवार आघाडीवर आहेत तर महाडिक गटाचे 2 उमेदवार आघाडीवर आहेत . दरम्यान विद्यमान चेअरमन रविंद्र आपटे पराभव झाला . यामुळे विरोधी गटाची गोकुळवर सत्तांतर झाले आहे मागील कित्येक वर्षांपासून महाडिक आणि पी एन पाटील यांच्या गटाची सत्ता होती .मागच्या कित्येक वर्षांपासून माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार पी एन पाटील यांच्या गटाचे गोकुळमध्ये वर्चस्व कायम राहिले आहे .
यावर्षी मात्र गोकुळमध्ये परिवर्तन होणार याबाबत जोरदार चर्चा रंगली होती. गोकुळला मल्टिस्टेट करण्यावरून मागच्या दोन वर्षांपासून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच लढाई सुरू होती. विरोधी गटाचे सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी गोकुळला मल्टिस्टेट होऊ न देण्याचा चंग बांधला होता . यावरून जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच उलथापालथ झाली होती . याचाच फटका सत्ताधाऱ्यांना बसल्याचे दिसून आले .तब्ब्ल १४ जागांवर मागच्या दोन फेऱ्यांपासून आघाडीवर असल्याने आता सत्ता सतेज पाटील गटाची येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. Gokul election results: At the end of the sixth round, Bunty Patil’s group has 14 candidates in the lead