कोल्हापूर: महाराष्ट्रात पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीनंतर आता कोल्हापूर मधील जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे. कोल्हापूर जिल्हातील पारंपरिक वैरी पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील आणि माजी खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक हे एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. गोकुळच्या मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे. बंटी पाटील-मुश्रीफ गटाने विजयाचे खाते उघडले आहे.पहिल्या पाचही आरक्षित जागांवर मुश्रीफ-पाटील गट आघाडीवर आहे. Gokul election results: Patil-Mushrif faction dominates the first four seats
पहिल्या ३ जागांच्या निकालानंतर माजी आमदार सूचित मिणचेकर यांनी ही अत्यंत आनंदाची बाब आहे असे म्हटले आहे.येणाऱ्या खुला वर्गातील १६ जागांसाठी देखील अशीच परिस्थिती असणार आहे असे मिणचेकर यांनी म्हटले आहे . नुकत्याच आलेल्या माहितीनुसार आता पालकमंत्री बंटी पाटलांच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रावर धाव घेण्यास सुरुवात केली आहे. आमदार बंटी पाटलांचा विजय असो अश्या घोषणा आता कार्यकर्त्यांनी मतदार केंद्रावर देण्यास यांनी सुरुवात केली आहे.
आरक्षित जागांपैकी उरलेल्या दोनही जागांमध्ये बंटी पाटील-हसन मुश्रीफ गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत.आता अंजना रेडेकर या बंटी पाटील-मुश्रीफ गटातील उमेदवार १५० मतांनी विजयी झालेल्या आहेत. माजी जिल्हापरिषद अध्यक्षाआणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या सून शौमिका महाडिक या देखील आता पिछाडीवर आहेत. खुद्द महाडिक घराण्यातील उमेदवार मतमोजणीत पिछाडीवर असल्याने आता महाडिक-पी.एन.पाटील गटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.