पुणे – भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन परिवहन मंत्री अनिल परब यांना लक्ष्य केलंय. मंत्री अनिल परब यांना विनंती करायची की आपण हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून सगळे दरवाजे ठोठावत आहात. त्यापेक्षा स्वत: आझाद मैदानात जाऊन आपल्याच मराठी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा का करत नाहीत?असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
बुधवारपेठेच्या वक्तव्यावरून गिरीष महाजनांनी खडसेंना सुनावलं; म्हणाले, त्यांचं डोकं फिरलं…
गोपीचंद पडळकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्वत: एसटी कर्मचाऱ्यांना भेटावं आणि ठामपणे आश्वासित करावं की बडतर्फीची कार्यवाही मागे घेण्यात येईल जेणेकरुन चर्चेचा मार्ग मोकळा होईल, असं म्हटलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होतेच की मी माझ्या मंत्र्यांना स्वतः मोर्चाला समोरे जाण्यास सांगेल, याची आठवण देखील गोपीचंद पडळकर यांनी करुन दिली आहे.
आम्हाला महाविकास आघाडीमध्ये कोणीच विचारत नाही; आमदार शहाजी पाटलांचा शिवसेनेला घरचा आहेर
माझ्या विनंतीचा नाही तर किमान उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या शब्दाचा तरी मान राखा आणि दोन पाऊल पुढे जाऊन आपुलकीने त्यांची समजूत काढा,चर्चा करा आणि यावर तोडगा काढा, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.
Read also:
- राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरूवात झाली आहे – राजेश टोपे
- पूलाच्या कामाला चतुराई दाखवली तशी रस्ता, खावटी योजनेचे पैसे, पोषण आहारालाही दाखवा – चित्रा वाघ
- मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वादाप्रकरणी गिरीश महाजन अडचणीत; पोलिसांना सापडली टेम्पोभर कागदपत्रे
- शिवसेना माघार घेणार नाही, त्यांना मुख्यमंत्रीपद देऊन तुम्ही मोठ्या मनाचे व्हा; आठवलेंचा सल्ला
- .यापुढे एसटी कर्मचाऱ्याच्या प्रत्येक मृत्यूला शरद पवार जबाबदार असतील – गुणरत्न सदावर्ते