पुण्यात १ जुलै २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या एकूण ७५० ग्रामपंचायती आहेत. संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यातर्फे या प्रत्येक ग्रामपंचायतीत एक प्रशासक नेमावा, असे आदेश राज्य सरकारतर्फे देण्यात आले आहेत
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयातर्फे प्रत्येक ग्रामपंचायतीत असलेल्या इच्छुक उमेदवारांसाठी एक अर्जाची प्रत दि. १४ जुलै रोजी करण्यात आली आहे. यात अर्जदाराला त्याचे नाव, पदाचा अनुभव, लोकसभा व विधानसभा मतदार संघ यांच्यासह अन्य तपशील फोटोसह भरायचा आहे. मात्र, या अर्जासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खात्यात जमा केलेल्या ११ हजार रुपये रोख रक्कमेचा पुरावाही जोडायचा आहे, असे पत्रक पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी काढले आहे.
यावर भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार घणाघात केला आहे. ‘वा रे पठ्ठयांनो.. लुटायला तर तुम्हाला संधीच हवी आहे…गावगाड्यातील कार्यकर्त्यांनाही सोडु नका. हाना चापून’ अस ट्विट करत गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर
वा रे पठ्ठयांनो ; लुटायला तर तुम्हाला संधीच हवी आहे…गावगाड्यातील कार्यकर्त्यांनाही सोडु नका.#हाणाचापून pic.twitter.com/br2pRDd4e2
— GOPICHAND PADALKAR (@mlcgopichand) July 15, 2020