जामखेड: मागच्या काही आठवड्यांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत-जामखेडचा दौरा केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा दौरा चांगलाच चर्चेत आला होता. माजी पालकमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी राम शिंदे यांच्यात एक गुप्त बैठक पार पडली होती आणि या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले. तेव्हापासून भारतीय जनता पक्षाने अत्यंत सावध पावले टाकत सर्व घडामोडींवर लक्ष दिले. राम शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीच्या अफवेनंतर धनगर समाजाचे नेते आणि विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांचा कर्जत-जामखेड मध्ये मुक्काम वाढलेला दिसत आहे.
हे पण वाचा, अजित पवारांच्या अज्ञात वासाचे केंद ‘अंबालिका’त भेट झाल्याचे वृत्त माजी मंत्री राम शिंदे यांनी फेटाळले
हे पण वाचा, साई संस्थानच्या अध्यक्षपदी आमदार निलेश लंके यांची नियुक्ती करण्यासाठी ‘या’ ग्रामपंचायतीने मांडला ठराव
आमदार गोपीचंद पडळकर यांची आक्रमक शैली अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट टीका करून ते कायमच चर्चेत असतात. आता त्यांनी आमदार रोहित पवार यांना देखील लक्ष केले आहे. त्यांनी कर्जत जामखेड मध्ये येऊन घोंगडी बैठक आणि इतरही कार्यक्रमांचा सपाटा लावलेला आहे. तसे पाहता राम शिंदे यांचे कट्टर वैरी आमदार रोहित पवार आहेत. मात्र सध्या आमदार गोपीचंद पडळकर थेट कर्जत जामखेड मध्ये येऊन आमदार रोहित पवारांवर टीका करत असल्याने त्यामधून नक्कीच काहीतरी वेगळा संदेश जातोय असे म्हणायला हरकत नाहीये.
हे पण वाचा, राष्ट्रवादीला नगरच्या ‘कुकडी’ खालील शेतीचे वाटोळे करायचे आहे, राम शिंदेंचा आरोप
हे पण वाचा, राम शिंदे यांनी कुकडीच्या पाण्याच्या बाबतीत हुरळून जाऊ नये; घनशाम शेलार यांचा सणसणीत टोला
भारतीय जनता पक्षाच्या मते पडळकर ओबीसी समाज आणि पक्षासाठी मोर्चेबांधणी करत आहेत मात्र त्यांच्या कर्जत-जामखेड मधील वाढत्या वावरामुळे राम शिंदे बॅकफूटवर गेले आहेत. ओबीसींच्या मुद्द्याला हात घालत भारतीय जनता पक्षाचे नेते महाविकास आघाडी सरकारवर तुटून पडत आहे आणि त्यामध्ये गोपीचंद पडळकर हे देखील आघाडीवर आहेत.रोहित पवार यांनी केलेल्या पराभवानंतर राम शिंदे यांचे अजूनही पुनर्वसन झालेले नाही. त्यातच पडळकर यांनी थेट कर्जत-जामखेड मतदारसंघात प्रवेश केल्याने राम शिंदेंची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.
हे पण वाचा,
कुकडी सल्लागार समितीच्या पदावरून घनश्याम शेलार यांची हकालपट्टी करा; सरपंच काकासाहेब धांडे यांची मागणी
साई संस्थानाच्या अध्यक्षपदाबाबतीत सत्यजित तांबे व आशुतोष काळे यांच्या नावासाठी मुबंईत खलबतं
अगस्ती सहकारी साखर कारखान्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग; सर्व संचालकांनी दिले राजीनामे
“निळवंडे धरणाच्या कामाला एकही रुपया कमी पडू देणार नाही” जलसंपदा मंत्री जयंत पाटील
नगरच्या महापौर पदाच्या दावेदार रोहिणी शेंडगे यांचा मार्ग सुकर; रिता शैलेश भाकरेंची बिनशर्त माघार