बीड : आज भगवानगड येथे दसरा मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी पंकजा मुंडे, प्रितम मुंडे, रासपचे अध्यक्ष आणि माजी कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी महादेव जानकर यांनी आपल्या भाषणातून तुफान फटकेबाजी केली. ‘गोपीनाथ मुंडेंनी वंचितांची मोट बांधली, आता तुम्ही पंकजा मुंडेच्या पाठी खंबीर राहा. माझ्या कानात गोपीनाथ मुंडेंनी कुर्रर्र केलंय, मेलो तरी ताईची साथ सोडणार नाही’, असं जानकर म्हणाले.
अनिल देशमुखांच्या घरावर पाचवेळा छापेमारी, आरोप करणारे मात्र आता कुठे दिसत नाहीत – शरद पवार
यावेळी जानकर म्हणतात, ‘नेता विकत घेता येत नाही, बनवता येत नाही ते रक्तातच असावं लागतं. आरशासमोर भाषण केल्यानं कुणी नेता होत नाही. नेता व्हायला अक्कल लागते. भगवानबाबा एकट्या वंजाऱ्यांचे नव्हते, ते सर्व जाती-धर्माचे होते. भगवान बाबांना जात नव्हती, तशी गोपीनाथ मुंडेंनाही जात नाही. गोपीनात मुंडे यांनी ऊस तोडणाऱ्या माणसाच्या हातात कोयता देण्याऐवजी त्याला आयपीएस, पीएसआय केलं. गोपीनाथ मुंडे नसते तर हा महादेव जानकर मेंढरं राखत बसला असता. त्यामुळे महादेव जानकर मेला तरी चालेल पण ताईची कधीच साथ सोडणार नाही. 31 मे रोजी गोपीनाथ मुंडेंनी माझ्या कानात कुर्रर्र केलंय,’ असं जानकर म्हणाले.
फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा पाकिटमारी झाली तरी बातम्या चालायच्या – चंद्रकांत पाटील
आजचा प्रोग्राम राजकीय नाही. हा पंकजा ताईंच्या शक्ती आणि युक्तीचा कार्यक्रम आहे. आमदार खासदार मिळतो पण नेता मिळत नाही. नेत्याला सांभाळणं हे आपलं काम आहे. मंत्री येतो आणि जातो, पण नेता कधी मरत नसतो. पंकजा यांचं हेलिकॉप्टर फिरलं नाही तर इथे आमदार खासदार तरी होतील का? नेत्याला सांभाळणं हे आपलं काम आहे. गोपीनाथ मुंडेंनी वंचितांची मोट बांधली. पंकजा मुंडेंच्या पाठी खंबीर राहा, असंही आवाहन महादेव जानकर म्हणाले.
Read Also :
- रोहित पवारांच्या संकल्पनेतून देशातील सर्वात मोठा ‘स्वराज्य ध्वज’ फडकला; शिवरायांच्या घोषणांनी आसमंत दुमदुमला
- वेळ आली तर तुमच्यावर जीव सुध्दा ओवाळून टाकेन; पंकजा मुंडेंची भगवानगडावर तुफान फटाकेबाजी
- पंकजाताईने, दसरा मेळाव्याला बोलावलं नसलं तरी श्रोत्यांमध्ये जाऊन बसणार – महादेव जानकर
- गर्व से कहो हम हिंदू है! शिवसेना भवनाबाहेर मनसेची बॅनरबाजी
- गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि सुटका; ‘या’ प्रकरणात कारवाई झाल्याने उडाली खळबळ