नागपूर : ज्यावेळी अतिवृष्टी होऊन मोठं नुकसान होत असतं तेव्हा नजर आणीबाणीच्या आधारावरच मदत करता येते. व्यक्तिगत पंचनाम्याची तेव्हा गरज पडत नाही. पंचनामे होत राहतील. पण शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मागणी केली.
शेतकऱ्याचं उभं पीक वाहून गेलं, अंत पाहू नका, पंचनामे नकोत, तात्काळ मदत द्या – राणा जगजितसिंह
मंत्री आणि प्रमुख लोकं गेले तर प्रशासन जागं होतं. लोकांना दिलासा मिळतो. कोण तरी आपलं ऐकतं हे लोकांना समजतं. मी सुद्धा उद्या दौऱ्यावर जाणार आहे. तीन दिवस जाणार आहे. वाशिमपासून माझा दौरा सुरू होत आहे. सरकारला पूरपरिस्थितीची माहिती देऊन जास्तीत जास्त मदत मिळवून घेण्याचा प्रयत्न करू, असं फडणवीस यांनी सांगितलं. राज्यात आतापर्यंत ज्या ज्या आपत्ती आल्या, त्यावेळी केलेल्या सर्व घोषणा हवेत विरल्या आहेत. कोणत्याच घोषणेची पूर्तता झाली नाही. कागदावरच घोषणा राहिल्या. ही वास्तविकता आहे. आमच्या सरकारने जो जीआर काढला होता. तशीच मदत देऊ असं त्यांनी सांगितलं होतं. पण ती मदतही त्यांनी अद्याप दिलेली नाही, असंही त्यांनी सांगितलं.
काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेवर सोलापूरात गुन्हा दाखल; काय आहे नेमकं प्रकरण, वाचा सविस्तर…
यावेळी त्यांनी कोस्टल रोडचा आराखडा मंजूर झाल्याने समाधान व्यक्त केलं. कोस्टल रोडचा आराखडा मंजूर झाला हे चांगलं झालं. आमचं सरकार असताना आम्ही हा आराखडा तयार केला होता. मी स्वत: कोस्टल रोडसाठी प्रयत्न केला होता. कोस्टल रोडमुळे सिडकोमधील अनेक प्रकल्प मार्गी लागतील असंही त्यांनी सांगितलं. कोरोनामुळे सातत्याने लहान घटक संकटात असताना आणि त्यांना कोणतीही मदत स्वतंत्रपणे दिली जात नसताना या आकस्मिक संकटांनी शेतकरी, कष्टकरी, हातावर पोट असणारे घटक खचून जाणार नाहीत, याची काळजी राज्य सरकारने घेतली पाहिजे. आज शेतकरी असो की समाजातील लहानातील लहान घटक, त्याला पोकळ शब्द किंवा आश्वासनांची नाही, तर प्रत्यक्ष आणि तीही तातडीच्या मदतीची गरज आहे. राज्य सरकारने यावर गांभीर्याने विचार करावा, ही कळकळीची विनंती आहे, असंही त्यांनी सांगितलं होतं.
Read Also :
- महापालिका निवडणुकीसाठी मनसेने कंबर कसली; ठाकरे पिता-पुत्र उद्या कल्याण-डोंबिवलीच्या दौऱ्यावर
- प्रोटोकॉलप्रमाणे चिपी विमानतळाच उद्घाटन होणार; नारायण राणेंच नाव कितव्या क्रमांकावर?
- जातीयवादी पक्ष एकत्र आले तरी काँग्रेसला फरक पडणार नाही; भाजप-मनसे युतीवर पटोले सडकून टीका
- मराठवाड्यातील पूरस्थितीला फडणवीस सरकारची ‘जलयुक्त शिवार’ कारणीभूत; भाजपाने मात्र दावा फेटाळला
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किती मिनिटांचा दौरा करतात हे पाहावं लागेल; मनसेचा टोला