मुंबई : राज्यातील शेकडो लोककलावंत, लोक कलाकार, लोककला पथकांचे चालक, मालक, निर्माते यांना कोवीड आर्थिक संकटाला मोठे तोंड द्यावे लागले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्यासमवेत एक बैठक पार पडली यात मुख्यमंत्र्यांनी कलाकारांसाठी एक रकमी कोविड दिलासा पॅकेज देण्यास मान्यता दिली असून यासंदर्भात विस्तृत प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर लगेच आणावा असे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील सांस्कृतिक कार्यमंत्री देशमुख यांची एक बैठक झाली होती.
सेनेसाठी विदर्भात धोक्याची घंटा, वर्षभरात तिघांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थान येथे सांस्कृतिक कार्य विभागाशी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक मनीषा वर्मा,सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, सिध्दीविनायक गणेश मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर उपस्थित होते.
मुंबईच काय घेऊन बसलात, पूरस्थिती जगभर निर्माण होतेय, तेथे महापालिका आमच्या ताब्यात आहे का?
गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्र कोविड संसर्गाशी लढा देत आहे. राज्यातील कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यात सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली असल्याने अनेक कलाकारांवर आर्थिक संकट ओढवले आहे. हे लक्षात घेऊन राज्यातील ५६ हजार कलाकारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज घोषणा केली. राज्यात सध्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे येथे जवळपास ८ हजार कलाकार असून राज्यात उर्वरित जिल्हयात जवळपास ४८ हजार कलाकार आहेत. या सर्व कलाकारांना प्रती कलाकार ५ हजार रुपये मदत देण्यात येणार असून यासाठी जवळपास २८ कोटी रुपये खर्च होणार आहे.
Read Also :
- “नावं बदलायची सोडून भाजप देशात विकासाठी काही करणार का?” काँग्रेसने घेतला आक्रमक पवित्रा
- मनसे नेत्याची मोठी प्रतिक्रिया, “मनसे आणि भाजप एकत्र आले तर आनंदच!”
- मोठी बातमी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ताफ्यातील ३ गाड्यांचा अपघात
- मोठी बातमी : राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदललं, आता “या” नावाने पुरस्कार
- मुंबईतील लोकल ट्रेनसाठी आंदोलन करणाऱ्या प्रवीण दरेकर यांच्यावर दंडाची कारवाई