IMPIMP

विकासाची गॅंरंटी..! जनतेचे १२०० कोटी पाण्यात, नव्या संसदेला लागली गळती..!

narendra modi sad

नवी दिल्ली : मागच्या वर्षी मोठ्या थाटामाटात सुरू केलेल्या नव्या संसदत भवनात अवघ्या १४ महिन्यांत गळती सुरू झाली आहे. तामिळनाडूच्या विरूधुनगर लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे खासदार मणिकम टॅगोर यांनी यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात नव्या संसदेत एका ठिकाणी पाणी गळतांना दिसत आहे. त्यासाठी जमिनीवर एक बादली देखील ठेवण्यात आली असून ओलसर जागा स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे विरोधी पक्षांकडून आता एनडीए सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू झाला आहे. यावरून राज्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगलाच टोमणा हाणला आहे.

हेही वाचा..“देवेंद्र फडणवीसांचं राजकारण संपविण्यासाठी ठाकरेंना शंभर जन्म घ्यावे लागतील” 

भारतातील कष्टकऱ्या करदात्यांचे १२०० कोटी रूपये खर्च करून निकृष्ट दर्जाचे नवे संसदभवन उभारले. परंतु दिल्लीत झालेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या १४ महिन्यात नव्या संसद भवनात गळती सुरू झाली आहे. ही आहे मोदी सरकारची निकृष्ट कामांची गॅरंटी..! असं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाने मोदींवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा..माढ्यात दोन भाऊ एकमेकांच्या विरोधात झुंजणार ? शरद पवारांची मोठी खेळी 

त्याचबरोबर सोशल मीडियावर दोन चित्र पोस्ट केले आहेत. यामध्ये पहिला फोटो हा नव्या संसदेची पाहणी करतांनाचा मोदींचा फोटो आहे. तर दुसरा फोटो हा गळतीचा आहे. यात विकासाची गॅरंटी आणि दुसऱ्या फोटोत १४ महिन्यात एक्सपायरी असं म्हटलं आहे. त्याखाली जनतेचे १२०० कोटी रूपये पाण्यात..! असा टोलाही त्यांनी लगावलाय.

दरम्यान, यावरून समाजवादी पार्टीचे प्रमुख आणि खासदार अखिलेख यादव यांनी देखील टोलेबाजी केली आहे. नव्या संसदेपेक्षा जुनी संसद चांगली होती. तिथे जुने संसद सदस्य येऊन भेटू शकत होते. अब्जो रूपये खर्चून बांधण्यात आलेल्या नव्या संसदेत गळती सुरू आहे. तोपर्यंत जुन्या संसदेत का जाऊ नये असा सवालही त्यांनी एक्सवरून विचारला आहे.

READ ALSO :

हेही वाचा..विधानसभा निवडणुका ठाकरे गट ‘या’ चिन्हावर लढणार ? निवडणूक आयोगाला धाडलं पत्र 

हेही वाचा..बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात पवारांनी २० तरूण हेरले ; परळी, बारामती, कागल ते दिंडोरीत धक्का देणार ? 

हेही वाचा..“तुम्हाला जळी, स्थळी, पाषाणी केवळ उद्धव ठाकरे दिसतात”, इतना डर होना भी चाहिए..! 

हेही वाचा…यंदा माधुरीताईंचं तिकीट कापणार? श्रीनाथ भीमाले भाजपकडून स्ट्रॉंग उमेदवार.!

हेही वाचा..मुख्यमंत्री शिंदेंचा फडणवीसांना दे धक्का..! शिवसेनेचा ‘हा’ हुकूमी एक्का स्वगृही परतला 

 

 

Total
0
Shares
Previous Article
Uddhav Thackeray

विधानसभा निवडणुका ठाकरे गट 'या' चिन्हावर लढणार ? निवडणूक आयोगाला लिहिलं पत्र

Next Article
Narhari Zirwal vs Dhanraj Mahale

महायुतीत बिनसलं..! नरहरी झिरवाळांच्या उमेदवारीला शिंदे गटाचा विरोध

Related Posts
Total
0
Share