कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील तीन मंत्री , दोन खासदार आणि डझनभर आजी – माजी खासदार आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघात ( गोकुळ ) पुन्हा सत्तारुढच बाजी मारणार की संघात सत्तांतर होणार याचा फैसला आता शेवटी होणाऱ्या मतमोजणीत होणार आहे खुल्या गटातील उमेदवारांची मतमोजणी करण्यास सुरुवात झालेली आहे.राखीव गटातील १६ पैकी १२ जागांवर आता विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडी आता संपूर्ण आघाडीवर आहे.
अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु असून, त्यामध्ये चुरस निर्माण झाली आहे . अशातच उद्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात १० दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर झाला आहे . Strict lockdown announced for 10 days in Kolhapur district या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी ट्विट करून जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर टीका केली आहे .शौमिका महाडिक यांचा नुकताच गोकुळ च्या निवडणुकीत विजय झालेला आहे.
कोरोना वाढलाय निवडणूक नको अशी भूमिका आम्ही घेतली असताना तेव्हा हट्ट आणि आता #गोकुळ निवडणूक झाल्यावर मग लॉकडाऊन अशी भूमिका घेणाऱ्या पालकमत्र्यांचा सत्तापिपासू चेहरा उघडा झालाय. तेव्हा माणसं मरत नव्हती का ? #कोल्हापूर ही गोष्ट कधीही विसरणार नाही.
— Shoumika Mahadik. (@shoumikamahadik) May 4, 2021
माजी जिल्हापरिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, कोरोना वाढलाय निवडणूक नको अशी भूमिका आम्ही घेत होतो; तेव्हा हट्ट केला आणि आता गोकुळ निवडणूक झाल्यावर मग लॉकडाऊन अशी भूमिका घेणाऱ्या पालकमंत्र्यांचा सत्तापिपासू चेहरा उघडा झालाय. तेव्हा माणसं मरत नव्हती का ? कोल्हापूर ही गोष्ट कधीही विसरणार नाही, अशा शब्दात शौमिका महाडिक यांनी मंत्री सतेज पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे .शौमिका महाडिक या माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या सून आहेत.