कोव्हिड19′ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेला ‘अनलॉक 2’ येत्या शुक्रवारी (31 जुलै) संपणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार पुढील टप्प्यात आणखी काही निर्बंध शिथिल केले आहेत. अनलॉक 3 च्या नव्या नियमावलीत योग इन्स्टिट्यूट आणि जिमला परवानगी देण्यात आली आहे. 5 ऑगस्टपासून व्यायामाच्या संस्था सुरु होऊ शकतात. तरी, त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक नियमांचे पालन करणे अनिवार्य असेल.
केंद्र सरकारने अनलॉक 3 च्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यानुसार, येत्या 5 ऑगस्टपासून देशभरात जिम सुरु करण्यास परवानगी दिली आहे. तसेच नाईट कर्फ्यूही हटवला आहे. मात्र मेट्रो, रेल्वे आणि सिनेमागृहावर देशभरात बंद राहणार आहे.
- केंद्र सरकारकडून ‘अनलॉक 3’ची गाईडलाईन्स जारी
- जीम उघडण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे.
- देशात 1 ऑगस्टपासून नाईट कर्फ्यूदेखील हटवला जाणार आहे.
- याशिवाय 31 ऑगस्टपर्यंत शाळा बंदच राहणार
- मेट्रो, लोकल ट्रेन यादेखील बंदच राहणार