कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध उतपदक संघ गोकुळ चे प्रमुख कर्मचारी, खातेप्रमुख, संचालक यांची रविवारी तब्ब्ल ५ तास बैठक घेऊन पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अक्षरशः झडती घेतली आहे. दुपारी तीन वाजल्यापासून ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत चाललेल्या बैठकीत म्हैस दुधात वाढ, पशुखाद्य वितरणातील उणीव दूर करणे, दैनंदिन खर्चात कपात करणे, गोकुळच्या विविध योजनांच्या फेरआढावा आदी विषयांवर दोन्ही मंत्र्यांनी गोकुळच्या प्रशासनास मार्गदर्शन केले आहे.
हे पण वाचा, गोकुळने शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचे काम केले आहे; शरद पवार यांनी केली गोकुळची मनभरून प्रशंसा
हे पण वाचा, ‘‘कारखान्याच्या सर्वांगीण हितासाठी आणि सभासदांच्या काळजीपोटीच मी सहकार पॅनलमध्ये’’; मदनराव मोहिते
गोकुळ दूध संघात तब्ब्ल २५ वर्षांनंतर सत्तांतर झाले आणि सतेज पाटील गट व मुश्रीफ गटाला सत्ता मिळाली. गोकुलमध्ये सत्ता आल्यानंतर मुंबईतील टँकर भाड्यांमध्ये १७ पैशांची कपात करून गोकुळ दूध संघाची वार्षिक ५.५० कोटींची बचत करण्याचा निर्णय नवीन संचालक मंडळाने घेतला आहे. त्याचप्रमाणे मुंबईमधील दूध पॅकिंगबाबत ‘महानंद’ सोबत करार केल्याने आता साडेतीन कोटी रुपयांची बचत होणार आहे. तसेच दूध संघाने ११० कोटी रुपये खर्चून २० लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्याची क्षमता केलेली आहे.
पुण्यातील दूध विक्रीच्या ठेकेदाराला बदलण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. या पार्शवभूमीवर आज पुण्यातील ठेकेदाराला नोटीस बजावण्यात येणार आहे. पुण्यातील ठेकेदार मागील सत्ताधिकाऱ्यांचा नातेवाईक आहे आणि त्यामुळे त्याला दर वाढवून देण्यात आला होता त्यामुळेच आता नव्याने ठेकेदार नेमला जाणार आहे. तसेच गोकुऴमध्ये २५ प्रकारची खरेदी सातत्याने केली जाते. मात्र खरेदी करत असताना ठरविक ठेकेदारांनाच पसंती देण्यात येते. यावेळी मात्र हे सर्व बदलण्यात येणार आहे आणि खरेदी करत असताना वर्तमानपत्रात जाहीर निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासमवेत अनेक महत्वपूर्ण निर्णय याबैठकीत घेण्यात आलेले आहे.
हे पण वाचा,
हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरकरांची जाहीर माफी मागितली.
पालकमंत्री बंटी पाटलांचा सत्तापिपासू चेहरा आता लोकांसमोर आलाय ; शौमिका महाडिक यांचा घणाघात
कोल्हापूर मनपा निवडणूक : भाजपची टीम जाहीर, धनंजय महाडिक विरुद्ध सतेज पाटील थेट सामना