IMPIMP

मी आहे तिथे सुखी; मात्र भविष्यात केंद्रात अन् राज्यात रासपची सत्ता आणणार..

जालना : सध्या सत्तापालटाचे नारे आणि महाविकास आघाडीत कुरुबुरीचे वारे बहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, एनडीएचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी एक महत्वाचे विधान केले आहे.

हे पण वाचा, धनगर आरक्षणाचा कायदा करा, अन्यथा पंढरपूरात ठाकरेंच्या हस्ते शासकीय महापूजा होऊ देणार नाही 

हे पण वाचा, ‘दोन्ही राजे एकत्र आल्याचे स्वागत, पण त्यांचं बोलणं भाजपच्या मिठाला जागल्यासारखं’

‘रासप हा सगळ्या समाजांचा पक्ष आहे, सध्याच्या घडीला पक्षाची ताकद वाढवण्याची गरज असून, त्या दृषटीने राज्याचा दौरा सुरु आहे. सध्यातरी लोकसभा, विधानसभा निवडणुकांना बराच वेळ आहे. त्यामुळे अजून तरी कुणासोबत जायचे, हा विचार केला नाही. मात्र, माझा पक्ष हा एनडीएचा एक महत्वाचा भाग आहे आणि मी त्यांच्यासोबत सुखी आहे,’ असं सांगत त्यांनी, ‘भविष्यात रासपची सत्ता राज्यात आणि केंद्रात आणायची आहे,’ असं वक्तव्य केलं आहे.

हे पण वाचा, उद्याच्या मराठा आरक्षणाच्या मोर्चात प्रकाश आंबेडकरही सहभागी होणार

हे पण वाचा, ‘मराठा समाजासोबतच दोन्ही राजेंनी ओबीसींच्या हक्कासाठी सुद्धा पाठिंबा द्यावा’

महादेव जानकर सध्या राज्याच्या अनेक जिल्ह्यांचा दौरा करत असून, पक्ष बांधणीचा आढावा घेत आहेत. आज जालना जिल्ह्यातल्या अंबडमध्ये ते आले होते. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर त्यांनी, दौरा आणि राज्यातील इतर महत्वाच्या विषयांवर पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी, त्यांनी महामारी काळात ठाकरे सरकारने केलेल्या उपाययोजनांचे कौतुक केले आहे.

हे पण वाचा, आता ओबीसी समाजही आक्रमक, छगन भुजबळांच्या निवासस्थानी ठरली आंदोलनाची दिशा 

हे पण वाचा, कोल्हापूरात उद्या मुक मोर्चा, कोणलाही उलट-सुलट बोलू नका – संभाजीराजे

तसेच, ‘मराठा, धनगर, ओबीसी आरक्षणासोबतच जे इतर प्रश्न आहेत, ते सोडवायचे असतील तर त्यासाठी आमची राज्यात आणि केंद्रात सत्ता यावी लागेल. त्यामुळे जनतेला आम्हाला मतदान करून पक्षाचे आमदार, खासदार त्यांना निवडून द्यावे लागतील,’ असं आवाहन केलं. सोबतच, ‘आपला मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा आहे, पण ते देत असताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये. तसेच, मराठाच नाही, तर ब्राम्हण, मुस्लिम, धनगर या सगळ्याच समाजातील गरीबांना आरक्षण मिळावे,’ अशी आपली भूमिका असल्याचे जानकर यांनी म्हटले आहे.

Read Also :

Total
0
Shares
Previous Article

नाना पटोले अडचणीत! बदनामी प्रकरणी भाजपने केली पोलिसांत तक्रार

Next Article

आंदोलनाआधी संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आवाहन केलं होतं; अजित पवाराकंडून खुलासा

Related Posts