मुंबई : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. आतापर्यंत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांनी ‘शिवतीर्थ’वर जाऊन भेट घेतली आहे. तर आज लेकीसह हर्षवर्धन पाटील यांनी राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’वर जाऊन भेट घेतली. मात्र ही भेट राजकीय नव्हती तर कन्या अंकित पाटील यांच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी घेण्यात आली.
अंकिता पाटील यांनी फेसबुकवरुन राज ठाकरेंसोबतच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. राज ठाकरेंची मुंबईत भेट घेतली, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे. लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी अंकिता पाटलांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
“देवेंद्र फडणवीसांपेक्षा चंद्रकांत पाटलांचीच मुख्यमंत्री होण्याची इच्छा जास्त!”
भाजप नेते आणि माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांची लेक लवकरच ठाकरे घराण्याची सून होणार आहे. बिंदुमाधव ठाकरे यांचा मुलगा निहार ठाकरे यांच्याशी अंकिता पाटीलयांचा विवाह होणार असल्याची माहिती मिळतेय. हा विवाह सोहळा 28 डिसेंबर रोजी होणार आहे. मागील काही दिवसांपासून या दोघांच्या विवाहाची चर्चा सुरु होती. त्याची अधिकृत माहिती आज मिळाली आहे. हर्षवर्धन पाटील आणि अंकिता पाटील यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या निवासस्थानी म्हणजेच शिवतीर्थ इथे भेट दिली. त्यावेळी 28 तारखेला होणाऱ्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण दिल्याची माहिती मिळत आहे. अंकिता पाटील यांनी राज ठाकरेंसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. राज ठाकरेंची मुंबईत भेट घेतली, असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी अंकिता पाटलांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती आहे.
शिवसेनेचे अनेक नेते माझ्या संपर्कात; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा गोप्यस्फोट
दरम्यान, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर लागलीच पुण्यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये अंकिता पाटील यांनी विजय मिळवत राजकारणात पदार्पण केले. जिल्हा परिषदेची निवडणूक त्यांनी विक्रमी मताधिक्क्याने जिंकली होती. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेले असले तरी अंकिता पाटील अद्यापही काँग्रेसमध्येच आहेत.
Read Also :
- ओबीसी नेत्यानो आरक्षण टिकवता येत नसेल, राजीनामा देऊन घरी बसा – बाळासाहेब सानप
- ओबीसी राखीव जागा असलेल्या नगरपंचायतींच्या निवडणुकीला स्थगिती; राज्य निवडणुक आयोगाचा निर्णय
- केंद्र सरकारने राज्याला ओबीसींचा इम्पेरिकल डेटा द्यावा; सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी
- भाजपाकडून काँग्रेसला धक्का; ‘हा’ बडा नेता हाती घेणार कमळ
- ‘…तर त्यांचा माज उतरवू’; सुजय विखेंचा रोहित पवार, नीलेश लंकेंना टोमणा