कोरोनाचे वाढते संसर्ग पाहता त्यावर नियंत्र मिळवण्यासाठी पश्चिम बंगालचे भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी अजब सल्ला दिला आहे. त्यांनी कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी गोमूत्र प्या असा सल्ला दिला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर दिलीप घोष चांगलेच चर्चेत आले आहेत. दिलीप घोष यांचा हा सल्ला देतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.
या बैठकीत बोलताना घोष म्हणाले ‘मी जर गायीबद्दल सांगायला लागलो तर अनेकांना ते पटणार नाही. गाढव कधीही गायीची महती समजू शकणार नाही. हा भारत आहे. भगवान श्रीकृष्णाची ही धरती आहे. इथे गायीची आपण पूजा करतो. गोमूत्राचे सेवन करणे हे आपल्या आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक आहे. जे दारू पितात त्यांना गायीचे महत्त्व कसे काय लक्षात येईल, या विधानामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत .
यापूर्वी त्यांनी देशी गायींच्या दुधामध्ये सोनं असतं, असा दावा केला होता. यामुळे देखील ते सोशल मीडियावर ट्रोल झाले होते. ‘देशी गायीचे एक वैशिष्ट म्हणजे त्याच्या दुधात सोनं असतं. म्हणून गायीचे दुध पिवळसर दिसतं’, असे विधान त्यांनी केले होते.