राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदाताई अंकुशराव टोपे यांचे वयाच्या 74व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या 74 वर्षांच्या होत्या. जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथे असलेल्या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना परिसरात शारदा टोपे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंत्यसंस्कार होत असल्याने कोरोना संबंधीच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी ट्विटरवरुन दिली होती.
शारदा टोपे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होत्या. मार्चमध्ये त्या महिनाभर रुग्णालयात दाखल होत्या. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. परंतु दोन महिन्यांनी पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना अंकुशनगर ता.अंबड येथून अंत्यसंस्कार विधीचे थेट प्रसारण… https://t.co/nv0V5mwTiK
— Rajesh Tope (@rajeshtope11) August 2, 2020