राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदाताई अंकुशराव टोपे यांचे वयाच्या 74व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या 74 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. याबाबतची माहिती राजेश टोपे यांनी ट्विट करू दिली आहे. 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता जालना येथील मुळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कोरोनामुळे राज्यात अंत्यसंस्कारासाठी जी नियमावली केली आहे, त्याचे पालन करून अंत्यसंस्कार केले जातील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. शारदा टोपे या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याच्या अध्यक्ष होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे.
ती अजातशत्रु होती.एका शब्दानेही तिने कुणाला दुखावलं नाही.सर्वांना प्रेम दिले. माझ्या वडिलांच्या सोबत ती सावली सारखी राहिली. ४ वर्षांपूर्वी वडिल गेल्यानंतर ती आधार होती.दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आर्शिवाद दिले. तो आशिर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील. pic.twitter.com/wyfYVJXnzX
— Rajesh Tope (@rajeshtope11) August 1, 2020
‘ती अजातशत्रु होती. एका शब्दानेही तिने कुणाला दुखावलं नाही. सर्वांना प्रेम दिले. माझ्या वडिलांच्या सोबत ती सावली सारखी राहिली. चार वर्षांपूर्वी वडिल गेल्यानंतर ती आधार होती. दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आर्शिवाद दिले. तो आशिर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील’, अशा शब्दात राजेश टोपेंनी आईविषयी भावना व्यक्त केल्या.
राज्याचे आरोग्यमंत्री व राज्य मंत्रिमंडळातील माझे सहकारी @rajeshtope11 यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे यांचं निधन हा आमच्यासाठी मोठा धक्का आहे. आदरणीय शारदाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली!त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही प्रार्थना!आम्ही टोपे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. pic.twitter.com/krCj1jTkxE
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 1, 2020
निधनाचे वृत्त कळताच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.