अमरावती : आधी जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने अवैध ठरविल्यावर आता खासदार नवनीत राणा आणखीन अडचणीत सापडल्या असून, यावेळी न्यायालयाकडून त्यांना उपलब्ध असणाऱ्या सगळ्या सुविधा देखील गोठवण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. तसेच, त्यांनी उपभोगलेल्या सगळ्या आर्थिक लाभांची देखील वसुली करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती माजी शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिली आहे.
हे पण वाचा, राजकारणात कोणी शरद पवारांचा हातही धरु शकत नाही – नवनीत राणा
हे पण वाचा, जातप्रणात पत्र ठरले अवैध: नवनीत राणा यांची खासदारकी जाण्याची कितीपत शक्यता?
नवनीत राणा यांच्याविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या आनंदराव अडसूळ यांनी, आज माध्यमांशी बोलताना सांगितले, ‘खासदार नवनीत राणांचे जात पडताळणी प्रमाणपत्र उच्च न्यायालयात अवैध ठरवण्यात आले. त्यामुळे, त्यांनी भारतीय संविधानाचा अपमान तर केला आहेच, पण ज्या मागासवर्गीय मतदारसंघातून त्या निवडणूक लढल्या त्या सर्व मागासवर्गीयांचाही हा अवमान आहे,’ असं मत तिखट प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
हे पण वाचा, माझ्यासाठी सर्वोच न्यायलायचे दरवाजे अजून खुले आहेत; नवनीत राणा यांची प्रतिक्रिया
हे पण वाचा, नवनीत राणांची खासदारकी धोक्यात; अमरावती आनंदराव अडसूळ विरुद्ध सीमा सावळे लढत होणार का?
तसेच, आता खासदार राणा या सर्वोच्च न्यायालयात, या याचिकेविरुद्ध दाद मागणार आहेत हे कळल्यावर, अडसूळ यांनी तातडीने सर्वोच्च न्यालयाच्या ऑनलाइन कोर्टात कॅव्हेट दाखल केले आहे. याशिवाय, आपण लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय निवडणूक आयोग आणि राष्ट्रपतींकडे देखील तक्रारीची कागदपत्रे सादर केली आहेत. तसेच, जात पडताळणी समितीला देखील या मुद्द्यावर आपण धारेवर धरणार असल्याचे अडसूळ यांनी स्पष्ट केले आहे.
Read Also :
- यंदाच्या आषाढी वारीचा वाद, तुषार भोसले भिडले थेट अजितदादांना म्हणाले…
- नागपूर राष्ट्रवादीत असंतोष: दुनेश्वर पेठेंच्या नियुक्ती नंतर पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
- प्रशांत किशोर-पवारांमध्ये तीन तास राजकीय खलबंत; २०२४ ला कायापालटाचे नेतृत्व शरद पवारांकडे?
- संभाजीराजे छत्रपती आज कोपर्डीत; बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबियांची भेट घेणार
- राज्याच्या अनेक प्रश्नांचे उत्तर केंद्राकडेच आहेत, त्यामुळे जमवून घ्यावे लागते