सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. देशातही दिवसेंदिवस कोरोनाची संख्या वाढत आहे. या कोरोनानाने देशातील आणि राज्यातील राजकीय नेत्यांनाही आपल्या विळख्यात अडकवले आहे.
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांना कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द अमित शाह यांनीच ट्विटरद्वारे माहिती दिली. आपल्या संपर्कातील व्यक्तींना कोव्हिड चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
“कोरोनाची सुरुवातीची लक्षणे आढळल्यानंतर, माझी चाचणी घेण्यात आली आणि अहवाल पुन्हा सकारात्मक झाला. माझी प्रकृती ठीक आहे, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला रुग्णालयात दाखल केले जात आहे. गेल्या काही दिवसात माझ्याशी संपर्क साधलेल्या सर्वांना माझी विनंती आहे की कृपया स्वतःला आयसोलेट करावे आणि तुमचीही चाचणी करून घ्यावी.” असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले आहे.
कोरोना के शुरूआती लक्षण दिखने पर मैंने टेस्ट करवाया और रिपोर्ट पॉजिटिव आई है। मेरी तबीयत ठीक है परन्तु डॉक्टर्स की सलाह पर अस्पताल में भर्ती हो रहा हूँ। मेरा अनुरोध है कि आप में से जो भी लोग गत कुछ दिनों में मेरे संपर्क में आयें हैं, कृपया स्वयं को आइसोलेट कर अपनी जाँच करवाएं।
— Amit Shah (@AmitShah) August 2, 2020