सध्या विविध समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत असलेल्या दूरध्वनी संभाषण असलेल्या एका कथित ऑडिओ क्लिपची उच्चस्तरीय चौकशी करण्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांना माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिले आहे.
सोशल मीडियावर सध्या फोनवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये नागपूर महापालिकेचे महापौर संदीप जोशी आणि भाजप नगरसेवक दयाशंकर यांना हनीट्रॅप करण्याबाबत गुन्हेगारी कटकारस्थानाचा उल्लेख आहे.
या कथित ऑडिओ क्लिपमध्ये राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचादेखील उल्लेख आहे. अनिल देशमुख यांच्या आशीर्वादानेच गुन्हेगारांना अभय दिले जात असल्याचा उल्लेख ऑडिओ क्लिपमध्ये आहे. त्याचबरोबर न्यायव्यवस्था मॅनेज करण्याबाबतही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे या ऑडिओ क्लिपची वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे केली आहे
“कथित ऑडिओ क्लिपमध्ये गंभीर उल्लेख असल्याने याप्रकरणी वरिष्ठ पातळीवर चौकशी करुन त्यातील सत्य जनतेसमोर मांडण्याची गरज आहे. याप्रकरणी आपण उच्चस्तरीय चौकशीचे आदेश द्याल, असा विश्वास आहे”, असं देवेंद्र फडणवीस अनिल देशमुख यांना पाठवलेल्या पत्रात म्हणाले
विविध समाजमाध्यमांमध्ये सध्या व्हायरल होत असलेल्या दूरध्वनी संभाषण असलेल्या एका कथित ऑडिओ क्लिपची उच्चस्तरिय चौकशी करण्याबाबत गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांना पत्र… pic.twitter.com/o5rHoQN7f4
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 14, 2020