पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोग ( यूपीएससी) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी ) या स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या जवळपास 30 विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पुण्याच्या बालेवाडी येथील पाटील वस्ती परिसरातील रणभूमी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे पार पडला. भाजप सदस्य तथा सोशल वेलफेअरचे अध्यक्ष लहु बालवडकर व सतीश पाटील यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
अखेर ‘नॉट रिचेबल’ अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल; कसून चौकशी होणार?
सामाजिक कार्यकर्ते लहू बालवडकर आणि सतीश पाटील यांच्या पुढाकाराने पुण्याच्या SPACE अकॅडमीच्या आजी-माजी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रशासनात नवीन येणाऱ्या तसेच प्रशासनात कार्यरत असलेल्या एकूण 70 पेक्ष्या जास्त अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी लहू बालवडकर म्हणाले की, आपल्या बुध्दी कौशल्याच्या जोरावर स्पर्धा परीक्षा मध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान झाला. भविष्यात चांगल्या प्रकारे प्रशासकीय सेवेत काम करून एक आदर्श घडविण्याच्या दृष्टीने त्यांना मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. तसेच परिसरातील तरुणांना या यश संपादन केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाहून स्पर्धा परीक्षेत यश संपादन करण्याकरिता प्रेरणा मिळावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील, साखर आयुक्त शेखर गायकवाड, आयएफएस राहुल पाटील, Joint रेजिस्ट्रार मिलिंद आक्रे, माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. एस. वानखडेंसह आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला पोलीस, revenue, वन, मंत्रालय, आयकर आदी विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सर्व प्रमुख वक्त्यांनी प्रशासनात येणाऱ्या नवीन अधिकाऱ्यांना स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करण्याविषयी कानमंत्र देऊन सर्व नवीन अधिकारांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्र संचलन सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती योगिता म्हस्के यांनी तर आभार प्रदर्शन अखिलेश खिस्ते यांनी केले.
Read Also :
- राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या मंत्र्यांना पैसे खाण्याचे प्रशिक्षण देतो – गोपीचंद पडळकर
- शरद पवारांवरील चिखलफेक महाराष्ट्र सहन करणार नाही – संजय राऊत
- नवाब मलिकांच्या डोक्यावर परिणाम झालायं, त्यांचा राजीनामा घ्या – प्रविण दरेकर
- आदित्यजी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तरी डरकाळी फोडा; भाजप नेत्या चित्रा वाघ यांच खरमरीत पत्र
- फोडा काय बॉम्ब फोडायचे, पण…; उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला