शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे शशिकला क्षयरोग आरोग्य धामच्या आवारामध्ये ग्रामीण रुग्णालय उभारण्यास परवानगी देण्यात आली असून, येथे रुग्णालय उभारण्यास 30 कोटी रुपये खर्च येणार आहे. या संबंधी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली आहे.
ग्रामीण रुग्णालय शिरोळ तालुक्यात उभारण्यात यावे, अशी मागणी राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी राज्यशासनाकडे केली होती. अखेर सार्वजनिक आरोग्य विभागाने शिरोळ येथे ग्रामीण रुग्णालय उभारण्यास मंजूरी दिली आहे.
यापूर्वी जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उदगाव येथे हलवण्या संदर्भात मागील सरकारने निर्णय घेतला होता. हा निर्णय रद्द करत आता नव्याने उदगाव येथे ग्रामीण रुग्णालय उभारले जाईल, असे यड्रावकर म्हणाले. लवकरच अनुदान उपलब्ध करून दिले जाईल व बांधकामास सुरूवात होईल असेही त्यांनी सांगितले.