अमरावती : महाविकास आघाडी सरकारच्या काळात हनुमान चालिसा पठणाच्या कार्यक्रमामुळे चर्चेत आलेल्या खासदार नवनीत राणा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. आज राम नवमी दिनानिमित्ताने त्यांनी राम भक्तांना अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून लोकांच्या प्रतिक्रिया देखील त्यावर मोठ्या प्रमाणात येत आहेत.
हेही वाचा… संजय राऊतांना कोर्टाचा मोठा दणका, ‘इतक्या’ रूपयांचा ठोठवला दंड
राम नवमीच्या दिनानिमित्ता नवनीत राणा यांनी आपल्या ट्विटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये बुलेटवर बसून, डोक्याला भगवं उफरणं घालून लोकांना शुभेच्छा देत आहेत. यात त्या ना हार की फिकर करते है, ना जित का जिकर करते है. जय श्रीराम असे म्हणतांना नवनीत राणा दिसत आहेत. तसेच त्यांनी काही अंतर बुलेटवर स्वारी देखील केली आहे.
हेही वाचा…“आरोग्य व्यवस्था वाऱ्यावर सोडून, आरोग्यमंत्री स्वत:चीच पाठ थोपटण्यात व्यस्त”
दरम्यान, येत्या ६ एप्रिल रोजी हनुमान जंयती आणि नवनीत राणा यांचा वाढदिवसाच्या निमित्तानं भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. अमरावतीत येत्या काही दिवसात १११ फुट उंचीची भव्य हनुमान मूर्ती विराजित केली जाणार आहे. या प्रकल्पाच्या भूमीपुजनाचा कार्यक्रम या दिवशी केला जाणार आहे. तर हनुमान पठणाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे.
हेही वाचा…“आव्हाडांच्या माजी अंगरक्षकाची आत्महत्या, भाजपला संशय, मनसुख हिरेन २.० असल्याचा दावा
यातच आज राम नवमीच्या दिनानिमित्ताने मातोश्रीबाहेर नवनीत राणा यांचे बॅनर्स लागले आहेत. उद्धव ठाकरे यांना नवनीत राणा यांच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला आहे. त्यामुळे आज राजकीय वातावरण तापलेलं आहे.
राम नाम का नारा है, हर घर भगवा छाया है, श्री राम नवमी के शुभ अवसर पर बुलेट राइडिंग करते हुए।
जय श्री राम।। जय हनुमान।।#RamNavmi #रामनवमी #ramnavami2023 pic.twitter.com/rRH2wPQ2Lz— Navnit Ravi Rana (@navneetravirana) March 30, 2023
Read also
हेही वाचा… पुण्याच्या आघाडीच्या तीन आमदारांनी घेतली उच्च न्यायालयात धाव, शिंदे-फडणवीसांच्या विरोधात याचिका दाखल
हेही वाचा…छत्रपती संभाजीनगर राडा प्रकरण..!”राजकीय पोळी भाजण्यासाठी एमआयएम, भाजप अन् शिंदे गटाने दंगल घडवली”
हेही वाचा…पुण्याचा नवा खासदार कोण ? भाजपमध्ये अनेकांची नावं चर्चेत, पोटनिवडणुक बिनविरोध की थेट लढत ?
हेही वाचा…“गिरीश बापट गेले, भाजप-शिवसेना युती टिकवण्यासाठी त्यांचे मनापासून प्रयत्न होते “, उद्धव ठाकरे
हेही वाचा…“ठाकरे गटाचे आणखी दोन खासदार भाजपच्या संपर्कात,” केंद्रीय मंत्र्यांचा मोठा दावा