पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी, “राज्यात जातीयवाद पहिल्यापासून होता. पण दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष वाटणं, हे याआधी महाराष्ट्रात घडत नव्हतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जातीयवाद वाढीस लागला,” असे मोठे विधान केले. त्यानंतर, शरद पवारांनीही त्यांना, “राज ठाकरेंच्यावर न बोललेलंच बरं, त्यांनी आधी प्रबोधनकार ठाकरे यांचं लिखाण वाचावं. आजोबांचं लिखाणचं त्यांना योग्य रस्ता दाखवेल,” असा खोचक टोला लगावला होता.
राज ठाकरेंनी राष्ट्रवादीवर केलेल्या ‘त्या’ आरोपावर अजित पवार उत्तरले, म्हणाले…
दरम्यान, आज पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी, “मी प्रबोधनकार ठाकरे वाचले आहेत आणि यशवंतराव चव्हाणही वाचले आहेत. प्रबोधनकरांचे संदर्भ त्या त्या काळातले होते. माझ्या आजोबांचं लिखाण आपल्याला हवं तसं घ्यायचं असं चालणार नाही. मी जे बोललो त्याचा माझ्या आजोबांच्या पुस्तकांशी काय संबंध होता, हे शरद पवार यांनी समजावून सांगावे. राष्ट्रवादीच्या जन्माननंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष वाढला. हे सर्वांना माहिती होतं. बोललो फक्त मी,” असं म्हणत शरद पवारांवर जोरदार पलटवार केला.”
संभाजी ब्रिगेड आणि मनसे वाद चिघळला, नेत्याने दिले थेट राज ठाकरेंना खुले आव्हान
यावेळी, त्यांनी शाळा-कॉलेजपर्यंत हा जातीयवाद पोहोचला आहे. आज मराठा समाज त्याच मुद्द्यावरून लढतो आहे. जर त्यांना आरक्षण मिळणार नसेल, तर सरकारने तसं स्पष्ट सांगावं. पण तसं होत नाही. पंतप्रधांनांनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली होती. पण राज्यात आजही जातीच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाते,” असं विधान करत, “आपल्याला महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश करायचा आहे का? जातीपातीच्या राजकारणातून राज्याने बाहेर पडायला हवं,” असं विधान त्यांनी केलं.
“राष्ट्रवादीच्या जन्मांनंतर जातीयवाद वाढीस लागला,”- राज ठाकरे; राष्ट्रवादीकडून दिली गेली प्रतिक्रिया
तसेच, “शरद पवारांच्या वाढदिवशी, मी भाषण केलं. तेव्हा आजचा दिवस पाहता काही गोष्टी राखून ठेवल्या पाहिजेत, असं मी बोललो. कुणी वाढदिवसाच्या दिवशी असं कुणी बोलत नाही. पण याचा अर्थ माझा पाठिंबा होता असं काही नव्हतं. राष्ट्रवादीचे नेते भाषणाचा शेवट छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख करून करतात आणि सुरुवात शाहू-फुले-आंबेडकर यांचा उल्लेख करून करतात. मुळात शिवरायांच्या भाषणापासून सुरुवात झाली पाहिजे, असं ते म्हणाले.
Read Also :
- “राणे कुणाच्या धमक्यांना घाबत नाहीत, ते सेनेला जशास तसे उत्तर देतील”, कराडांचा इशारा
- माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी “भारतीय लोकशाहीचे आदर्श नेते”- गडकरी
- राज ठाकरेंनी राष्ट्रवादीवर केलेल्या जातीयवादाच्या आरोपाला, शरद पवारांचे सडेतोड उत्तर
- ब्रेकिंग! पारनेर तहसिलदाराने आमदार लंकेच्या जाचाला कंटाळून दिला आत्महत्येचा इशारा!
- गडकरींच्या ‘त्या’ पत्रावर मुख्यमंत्र्यांनी, गडकरींच्याच उपस्थितीत सोडले मौन; म्हणाले “विश्वासघात…”