बारामती : काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये एका हॉस्पिटलचे उदघाट्न केले होते. कामाचा व्याप जास्त असल्याने त्यांनी अर्धा तास वेळ देऊन लगेचच कार्यक्रम आटोपता घेतला.
कोरेगाव भिमा पर्यटन स्थळापेक्षा शुरवीरांची भुमी म्हणून ओळखली जावी – नितीन राऊत
त्यानंतर तिथं भारतीय जनता पक्षाचे माण-खटाव विधानसभा क्षेत्राचे आमदार जयकुमार गोरे आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची एंट्री झाली. यावेळी झालेल्या भाषणांमध्ये भाजपच्या आमदारांनी अजित पवारांच्या कार्यशैलीचे तोंडभरून कौतुक केले.
नवाब मालिकांनी दोन ऑडिओ क्लिप ऐकवत पुन्हा फोडला बॉम्ब; समीर वानखेडेंवर केले ‘हे’ गंभीर आरोप
आमदार गोरे म्हणाले की भारतीय जनता पक्षाचा आमदार असलो, माझी राजकीय भूमिका काहीशी वेगळी असली तरी मी अजित दादा पवार यांचा खूप मोठा फॅन आहे. त्यांची कार्यशैली, धाडस, धडाडी यांचा विचार करता मी त्यांचा चाहता आहे. हे जाहीरपणे सांगायला मला कसलाही संकोच वाटत नाही असं म्हणत जयकुमार गोरेंनी अजित पवारांवर स्तुतीसुमने उधळली आहेत.
“एकमेकांची उणी-दुणी काढण्यापेक्षा केंद्रातून निधी आणा”; अजित पवारांचा नारायण राणेंना सल्ला
लगेचच राज्यमंत्री भरणेंच भाषण सुरु झालं आणि त्यांनीही गोरेंच्या भाषणाचा धागा पकडून लगेचच त्यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर देऊन टाकली. थेट ऑफर दिलेली नसली तरी देखील तुमचा विचार असेल तर आम्ही त्याला निश्चित प्रातिसाद देऊ असंही भरणे त्यावेळी म्हणाले. बारामतीकरांनी हात दिला तर काहीही होऊ शकतं. चुकतो तोच माणूस असतो, तुम्ही हाडाचे सच्चे कार्यकर्ते आहात. तुम्ही येणाऱ्या काळात थोडा चांगला आणि वेगळा विचार करा असा सल्ला देखील राज्यमंत्री भरणे यांनी जयकुमार गोरेंना दिला.
Read also:
- सांगली जिल्हा बँकेच्या राजकारणात नवा वाद, बँकेच्या डायरीतून पडळकरांचे नाव गायब
- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा; यापुढे सर्व सरकारी वाहने असणार इलेक्ट्रिक
- ठाकरे – पाटील विवाहला लागली कोरोनाची नजर, आता अंकिता पाटील देखील कोरोना पॉझिटिव्ह
- राज्यपालांवर बंदूक ठेवून भाजपा महाराष्ट्रात राजकारण करत आहे – नाना पटोले
- पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत जातीवाद; अजित पवारांनी व्यक्त केली खंत