मुंबई – भाजपा नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज ओबीसी आरक्षणाच्या मुद्य्यावरून राज्य सरकारवर टीका करताना, मंत्री छगन भुजबळ यांच्यावर देखील निशाणा साधला. छगन भुजबळ हे समता परिषदेच्या माध्यमातून नौटंकी करत आहेत, असा आरोपही बावनकुळे यांनी केला. तसेच, ओबीसी आरक्षणाबाबत आपण दोन प्रमुख मागण्या घेऊन सर्वोच्च न्यायालयात जात आहोत असे सांगून त्यांनी त्याबद्दल माध्यमांना माहिती दिली.
“आता पालिकेच्या सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली!”
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “छगन भुजबळ वारंवार समता परिषदेला पुढे करून नौटंकी करत आहेत. समता परिषदेला पुढे करून जाणीवपूर्वक केंद्र सरकारविरोधात आंदोलन करायला लावत आहेत. एकीकडे राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात शब्द देतं, की तीन महिन्यात आम्ही डेटा देतो आमि दुसरीकडे समता परिषदेला पुढे करून, ते आपले कपडे वाचवण्याचं काम करत आहे. छगन भुजबळ समता परिषदेच्या नावाने राजकारण करताय, नौटंकी करत आहेत, या वयात त्यांना हे शोभत नाही.”
आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या टिकेल छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भुजबळ म्हणाले,”बावनकुळेंना म्हणा टीका करण्यापेक्षा स्वतःच्या मनाला विचार एवढे दिवस इम्पेरिकल डेटा असून सुद्धा केंद्र सरकार दिला नाही. ओबीसींच्या इम्पेरिकल डेटा वरून महाराष्ट्र सरकारवर केस सुरु होती तेव्हा केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला अडचणीत टाकण्याचे काम केले. मात्र आता जेव्हा निवडणुकांची वेळ आली तेव्हा तो डेटा बाहेर आला.”
ते पुढे म्हणाले,” चंद्रशेखर बावनकुळे तुम्ही अशी नाटक करायची काही कारण नाही. हि अशी बोंबाबोंब करायची गरज नाही.” तसेच समता परिषेदेबाबत बोलताना भुजबळ म्हणाले,”चंद्रशेखर बावनकुळे यांचा जळफळाट होत आहे. आम्ही काय काय काम केली आहेत हे सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळेंच्या सर्टिफिकेटची मला गरज नाही. ते फक्त पोपटासारखे बोलत आहेत. अशी टीका भुजबळ यांनी केली.
Read also:
- सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक राणेंनी कशी जिंकली?, दीपक केसरकरांनी सांगितलं गुपित!
- एनसीबीमधून समीर वानखेडेंची अखेर बदली, ‘या’ खात्यात केली नियुक्ती
- राज्य निवडणूक आयोगाने आगामी निवडणुका ओबीसींविना घेऊ नये, बावनकुळेंची सुप्रीम कोर्टात धाव
- आशिष शेलारांच्या खात्यात मोदींनी १५ लाख टाकले वाटतं?, सचिन सावंतांचा खोचक सवाल
- म्हाडा, एपीएससी परीक्षेबाबत महत्त्वाची बातमी, ‘या’ दिवशी होणार दोन्ही परीक्षा