नाशिक : नाशिक पदवीधर मतदार संघावर माझ्या वडिलांनी गेल्या 14 वर्ष प्रतिनिधीत्व केलं. त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षातील नेते आमच्यासोबत आहेत. आम्ही फक्त निवडणुकी पुरतंच राजकारण करत आलो आहोत. सामान्य लोकांसाठी आम्ही कधीही पक्षीय भेदाभेद ठेवत नसतो. याची पंरपरा आम्ही जपली आहे. त्यामुळे आमच्यासोबत सगळेच राजकीय पक्ष प्रमाने काम करतांना दिसत आहेत. असं नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी सांगितले. आज राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्यावेळी ते बोलत होते.
”मुंबई महापालिकेवर आमचाच झेंडा, 2024 ला पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री…” बड्या नेत्याचं भाकित
नाशिक पदवीधर मतदार संघ हा 54 तालुक्यांचा आणि चार हजारांपेक्षा जास्त गाव असल्याचा मतदार संघ आहे. त्यामुळे येथील सगळ्याच संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत विजय माझा झालाच आहे. फक्त मताधिक्य किती पडतंय. ते पाहणं आवश्यक आहे. आता पर्यंत 100 संघटना आणि विविध राजकीय नेत्यांनी मला पाठिंबा दिला आहे. एक चांगला उमेदवार म्हणून तुमच्या पाठिशी लोकं उभ राहत असतील तर त्याचा अधिक आनंद आहे. असंही ते म्हणाले.
ऊर्फी जावेदवर आता टिका नको, तिचं कौतुक करा, चित्रा वाघ यांनी केलं ऊर्फीचं कौतुक
तसेच आगामी काही काळात तुम्ही एकाद्या पक्षात प्रवेश करणार का ? या प्रश्नावर ते म्हणाले की, मी अपक्ष म्हणून आहे, आणि भविष्यातही अपक्ष म्हणूनच राहणार आहे. तसेच माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियावर जे काही गेल्या दहा दिवसांपासून राजकारण सुरू आहे. त्यावर वेळ आल्यावर योग्य ते उत्तर देऊ. असंही सत्यजीत तांबे म्हणाले.
कसबा पेठ पोटनिवडणुक मनसेने लढवावीच,; मनसेच्या कार्यकर्त्यांची राज ठाकरेंकडे मागणी
दरम्यान, माझी उमेदवारी ही अपक्ष म्हणून नव्हती तर ती काॅंग्रेसचीच होती. तीन वाजेपर्यंत एबी मध्ये जोडू शकलो नाही म्हणून ती अपक्ष झाली आहे. माझी अपक्ष उमेदवारी नव्हतीच. तसेच जे काही अर्थसत्य आहे. त्यावर थोड्या दिवसांनी सांगणार आहे. त्यावेळी लोकं चक्कीच होतील. असं म्हणत सत्यजीत तांबेंनी नाना प टोले यांच्या आरोपांवर उत्तर दिलं.
Read also
- पुण्यात आपचं संघटन वाढतयं…! काळजेवाडी चऱ्होली बुद्रुक येथे आप च्या शाखेचे उदघाटन
- “..तर त्यावेळी महेश लांडगे हे शिवसेनेचे आमदार झाले असते”, शिंदेंनी सांगितली जुनी आठवण
- “हिंदु आक्रोश मोर्चा हा मोदी आणि शहांच्या विरोधात,” संजय राऊतांची भाजपवर प्रखरशब्दात टिका
- कसबा पोटनिवडणुकीत आघाडीत रस्सीखेच आणखीच वाढली, शिवसेना, काॅंग्रेसमध्येच जुंपली
- “बागेश्वर बाबा जिथं दिसेल, तिथे त्याला ठोकून काढा,” संत तुकाराम महाराजांवर केलेल्या विधानानंतर मिटकरी आक्रमक