मुंबई : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते यांची जनआशीर्वाद यात्रा मुंबईतून सुरू झाली. यावेळी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडलेल्या पाहायला मिळाल्या. नारायण राणे यांनी दादर येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतले. यानंतर शिवसैनिकांनी त्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण केल्याचे सांगितले जात आहे. यावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांना टोला लगावला आहे. तो स्थानिक प्रश्न आहे, स्थानिक नेते त्यावर बोलतील, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
अब्दुल सत्तार आणि माझे पैसे एकत्र करू म्हणावं, बघू कोण हरतं; रावसाहेब दानवेंचं ओपन चॅलेंज
केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर स्वातंत्र्यवीर स्मारक आणि इंदू मिल येथेही भेट दिली होती. यानंतर ठाकरे सरकार आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली. याबाबत पत्रकारांनी संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता, संजय राऊत यांनी याला बगल दिल्याचे पाहायला मिळाले.
आता तरी देव आम्हाला पावणार का? १५ लाख देणार का? देव चोरला म्हणत राष्ट्रवादीचे आंदोलन
भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेवेळी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतर शिवसैनिकांनी या स्मृतीस्थळाचे शुद्धिकरण केले. याबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आले असता, नाही माझ्या काही वाचनात आले नाही, असे सांगितले. पुढे पत्रकारांनी त्यांना घडलेल्या घटनांचा संदर्भ देत पुन्हा प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना राऊत यांनी, आमचे शाखा प्रमुख, नगरसेवक, आमदार यावर बोलतील. हा स्थानिक प्रश्न आहे, असे राऊत म्हणाले.
अब्दुल सत्तार आणि माझे पैसे एकत्र करू म्हणावं, बघू कोण हरतं; रावसाहेब दानवेंचं ओपन चॅलेंज
कोण नारायण राणे? यावर मला माहित नाही. आमचे शाखा प्रमुख किंवा आमदार यावर बोलतील. अतिशय स्थानिक विषय हा आहे, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य केल्यानंतर यासंदर्भात पत्रकार परिषदेवेळी पत्रकारांनी नारायण राणेंना विचारणा करण्यात आली, तेव्हा मी ओळख करुन देईन, जवळ बोलवेन आणि ओळख करुन देईन असा पलटवार नारायण राणे यांनी केला आहे.
…अन् चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले; कोथरूडमध्ये घडला अपघात
दरम्यान, ज्यांना गोमूत्र शिंपडायचे आहे, त्यांना शिंपडून द्या. ते स्मारक दलदलित आहे. फोटो पण साहेबांचा नीट दिसत नाही. आधी स्वतःचे मन शुद्ध करा. येऊ देणार नाही असे म्हटले पण आम्ही गेलो तेव्हा तिथे कुणीच नव्हते. मी जर त्यांचा पुत्र असतो, तर येऊच दिले नसते. आणि शुद्धीकरण करायला ब्राह्मण लागतात ते कुठे होते? आम्हाला सांगा आमच्याकडे ब्राह्मण आहेत, आम्ही दिले असते, असा हल्लाबोल नारायण राणे यांनी केला.
Read Also :
- बाळासाहेबांचं स्मारक दलदलीत, मी पुत्र असतो तर त्यांना इथे येऊच दिलं नसतं – नारायण राणे
- आमदार महेश लांडगेंचा “गनिमी कावा” : सांगलीत अखेर बारी झालीच; बैलागाडा शर्यतीचा लढा!
- “…तेव्हाच मी ईडीच्या चौकशीला सामोरे जाईन,” अनिल देशमुखांनी दिलं पहिल्यांदाच थेट उत्तर
- “आम्हाला फक्त ब्रह्मज्ञान आणि त्यांच्याकरता कोरडे पाषाण”, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला
- ….त्यामुळेच भाजपने नेत्यांनी ‘जन आशीर्वाद’ यात्रा काढली, अब्दुल सत्तारांचा मोठा दावा