मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात शिवसैनिक संतोष परब हे जबर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांनी या हल्ल्याबद्दल आमदार नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
खासदार सुप्रिया सुळेंना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना टेस्ट करुन घेण्याचं आवाहन
नितेश राणे यांचा कार्यकर्ता गोट्या सावंत आणि आणखी एका आरोपीस या संदर्भात अटक करण्यात आली आहे. नितेश राणे यांच्या जामिनावर अत्यंत महत्वाची सुनावणी काल होत असताना ते या सुनावणीलाही गैरहजर राहिले आहे.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार? शिवसेना खासदार संजय राऊतांच मोठं विधान
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नितेश राणे प्रकरणात पत्रकारांनी काही प्रश्न विचारले तेव्हा फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात ठिकठिकाणी चोऱ्या, बलात्कार, घोटाळ्यांच्या घटना सातत्याने घडत आहेत. पोलिसांना या प्रकरणांमधील आरोपींना पकडण्यासाठी वेळ नाही मात्र नितेश राणेंच्या अटकेसाठी राज्याचे १२ मुख्य अधिकारी सिंधुदुर्गात तळ ठोकून बसले आहेत.
राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार वादात काँग्रेसची उडी; बाळासाहेब थोरातांनी केलं मोठं विधान
आम्ही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. कोणत्याही परिस्थितीमध्ये दंडेलशाही आम्ही खपवून घेणार नाही अशी रोकठोक भूमिका फडणवीसांनी मंडळी आहे. अजूनही नितेश राणे हे फरार आहेत. आज त्यांच्या जामीन अर्जावर अंतिम सुनावणी होणार आहे. त्यानंतर त्यांना अटक होते की जामीन मिळतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Read also:
- नितेश राणेंना जामीन मिळणार की पुन्हा अटक? आज होणार अंतिम फैसला
- माझ्यामुळं राष्ट्रवादीने एकदा पराभव चाखला, त्यामुळेच मला जाणूनबुजून अडकवलं जातंय – गोपीचंद पडळकर
- १०० कुत्री मिळून एकट्या वाघाची शिकार करु शकत नाहीत; मुंबईत राणे समर्थकांची बॅनरबाजी
- भाजप आमदाराच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मोठी दुर्घटना; शॉक लागून चार कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू
- भाजप आमदाराच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मोठी दुर्घटना; शॉक लागून चार कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू