पालघर : बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी थेट पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावरच हल्ला केला आहे. चव्हाण यांच्यावर जिल्ह्यातून १०० कोटी रूपये वसुलीची जबाबदारी असून ते महामार्गावरील हॉटेलमध्ये अधिकारी आणि ठेकेदारांच्या बैठका घेत असल्याचा आरोप ठाकूर यांनी केलाय. त्यामुळे संतप्त झालेल्या रवींद्र चव्हाण यांनी हितेंद्र ठाकूर यांच्यावर पाच कोटी रूपये अब्रुनुकसानीचा दावा ठोकला असल्याची माहिती समोर येत आहे. त्यावरून आता पुन्हा हितेंद्र ठाकूर यांनी चव्हाणांना प्रत्युत्त दिलंय.
हेही वाचा..“मोदींना आता ग्रामपंचायत, नगरपंचायत निवडणुकीलाही प्रचाराला बोलवा”
बहुजन विकास आघाडीने पालघर लोकसभा मतदारसंघात राजेश पाटील यांना मैदानात उतरवलं आहे. यातच त्यांच्या प्रचारासाठी एक सभा पार पडली. त्यावेळी त्यांनी रवींद्र चव्हाणांना प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले की, पाच कोटी रूपयाची नोटीस पाठवून माझा अपमान केला आहे. पाठवयची असती तर मोठी पाठवली असती. असं म्हणत घोडा मैदान नजदिक है पाहून घेऊ.. माफी कधीच मागणार नाही. ठाकूर आहे मी माफी कधीच मागणार नाही. नोटीसला आम्ही उत्तर देऊ. अशा नोटीस अनेक येतात. ते पाहून घेऊ. असेही हिंतेद्र ठाकूर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, उत्तर भारतीय सर्वच नागरिक आमच्यासोबत आहेत. अब की बेढा पार, निवडून येणार नाही हे लक्षात आलं आहे. राज्यात इतक्या सभा होत आहेत. तसेच अनेक टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. त्यांच्याही लक्षात आलं आहे की आपली हार निश्चित आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सभा, रोड शो झाले आहे. महाराष्ट्रात इलेक्शन टुरिझम सुरू झालं आहे. अनेक लोकांना रोजगार मिळतो अन् गरिबांचं पोटं भरतं असं म्हणत हितेंद्र ठाकूर यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा..“या हुकूमशहाचा विषाणूपासून देशाला वाचवायचे आहे”, ठाकरेंचा मोदींवर जोरदार घणाघात
हेही वाचा…“ही दोस्ती तुटायची नाय, पण हा राक्षसी माणूस खासदार म्हणून नको”
हेही वाचा…“तर जय श्रीराम शिवाय यांना काहीच सुचत नाही”, जयंत पाटलांचा खोचक टोला
हेही वाचा…भाजपच्या या सहा राज्यात कमी होणार जागा, भाजपप्रणित एनडीए २७२ ही मॅजिक फिगर गाठू शकणार नाही